Ind vs Aus: काल बुमराहशी वाद घातला, आज सिराजने माघारी धाडले; कॉन्स्टास बाद होताच कोहलीने मैदानात काय केले?, VIDEO
Ind vs Aus 5th Test Match Sam Konstas Video: भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
Ind vs Aus 5th Test Match Sam Konstas Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना सिडनी मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 184 धावा केल्या. सध्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 6 विकेट्स गमावत 136 धावांवर पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून आता अॅलेक्स कॅरी आणि पॅट कमिन्स सध्या फलंदाजी करत आहे.
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला पाच धक्के बसले. विशेष म्हणजे, सॅम कॉन्स्टास (Sam Konstas vs Jasprit Bumrah) बाद होताच विराट कोहलीने जोरदार सेलिब्रेशन केले. मोहम्मद सिराजने सॅम कॉन्स्टास झेलबाद केले. सॅम कॉन्स्टासने (Sam Konstas) 38 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. सॅम कॉन्स्टन्सची विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना देखील सेलिब्रेशन करण्यास सांगितले. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Sam Konstas vs Virat Kohli Video)
DSP SIRAJ ON DUTY...!!! 🫡🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
- Gets Sam Konstas and Travis Head in the same over. 🤯pic.twitter.com/kZ13n6K4U5
Siraj gets Konstas while Kohli asks the crowd to roar. 🔥🔥 pic.twitter.com/oHPFYh3XTQ
— Aditya Saha (@Adityakrsaha) January 4, 2025
सॅम कॉन्स्टास आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद-
सामन्याच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टन्स यांच्यात जोरदार वादावादी झाली. दिवसाच्या शेवटच्या षटकात बुमराह आणि कॉन्स्टन्स यांच्यात शाब्दिक लढाई झाली. यानंतर बुमराहने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे.
मोहम्मद सिराजने एका षटकात 2 विकेट्स-
कॉन्स्टन्सशिवाय सिराजने डावाच्या 12व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हेडला 3 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने केवळ 04 धावा करता आल्या. हेडची विकेट भारतासाठी खूप महत्त्वाची होती कारण त्याने या मालिकेत दोन शतके झळकावली आहेत.
टीम इंडियाचा डाव 185 धावांवरच अडकला-
सिडनी कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा डाव 185 धावांवरच मर्यादित राहिला. यादरम्यान ऋषभ पंतने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. याशिवाय संघाचे जवळपास सर्वच फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरले.