Ind vs Aus Gautam Gambhir Team India: गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यापासून काय काय घडलं?; निराशाजनक कामगिरीने चाहते संतापले
Ind vs Aus Gautam Gambhir Team India: गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताची कामगिरी घसरली आहे.
Ind vs Aus Gautam Gambhir Team India: भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus test match) यांच्यातील मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा दारुन पराभव झाला. या पराभवासह टीम इंडियाने मालिका 3-1 ने गमावली आहे. इतकेच नाही तर आता भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताची कामगिरी घसरली आहे. भारताला न्यूझीलंडकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला. 36 वर्षात प्रथमच न्यूझीलंडनं कसोटीत भारताला भारतात हरवले. तर श्रीलंकेविरुद्ध 27 वर्षात पहिल्यांदाच द्विपक्षीय एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावली.
गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यापासून काय काय घडलं?
1. 27 वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध वन डे मालिका गमावली
2. भारतानं प्रथमच 3 मॅचच्या वन डे सिरीजमध्ये सर्व 30 विकेट्स गमावल्या
3. 45 वर्षानंतर प्रथमच भारत वन डे मध्ये एकदाही जिंकू शकला नाही
4. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारत प्रथमच 0-3 अशा फरकानं हरला
5. 36 वर्षात प्रथमच न्यूझीलंडनं कसोटीत भारताला भारतात हरवले
6. 19 वर्षानंतर चेन्नईमध्ये भारताला पराभूत व्हावं लागलं
7. भारत मायदेशात प्रथमच कसोटी डावात 50 धावांत गारद
8. 12 वर्षानंतर भारतानं मायदेशात कसोटी मालिका गमावली
9. 12 वर्षानंतर पहिल्यांदाच भारतानं सलग दोन कसोटी गमावल्या
10. 12 वर्षानंतर भारत वानखेडेवर कसोटी क्रिकेटमध्ये हरला
11. 13 वर्षानंतर प्रथमच भारत मेलबर्नमध्ये हरला
12. 10 वर्षानंतर भारत सलग दोन कसोटी मालिकांमध्ये हरला
13. 10 वर्षानंतर भारतावर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की
14. 12 वर्षानंतर प्रथमच भारत ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत 3 सामने हरला
15. गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारत प्रथमच टेस्ट चँपियन्सशीपच्या फायनलसाठी अपात्र ठरला
टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर काय म्हणाला?
टीम इंडियाचे अनेक सीनियर खेळाडू आहेत जे बर्याच काळापासून देशांतर्गत क्रिकेट खेळलेले नाहीत. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आहे. त्यामुळे गौतम गंभीर हा इशारा थेट त्या दोघांनाच होता. या मालिकेदरम्यानच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीच्या बातम्याही आल्या होत्या. कारण खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या रोहितने सिडनी कसोटी सामन्यातूनही स्वतःला बाहेर ठेवले होते. गंभीरने म्हटले आहे की, मी कोणत्याही खेळाडूच्या भविष्यावर भाष्य करू शकत नाही. हे खेळाडूंवर अवलंबून आहे. पण भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते ते करतील, असं गौतम गंभीर पत्रकार परिषद घेत म्हणाला.