एक्स्प्लोर

IND Vs AUS 2nd Test | बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा आठ विकेट्सनी विजय, मालिकेत बरोबरी

भारताने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी केली.

मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारताने विजय नोंदवला आहे. भारताने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी केली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 70 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतीय संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

सलामीवीर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शुभमन गिलने नाबाद 35 आणि अजिंक्य रहाणेने नाबाद 27 धावा केल्या. अॅडलेड कसोटीत लाजिरवाणा पराभव झाल्याने टीम इंडियासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा होता.

दरम्यान या कसोटी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कसोटीच्या पहिल्या दिवसापासूनच भारताचं वर्चस्व राहिलं. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांन ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं जसप्रीत बुमराने चार, आर अश्विनने तीन, मोहम्मद सिराजने दोन आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 195 धावांमध्ये गुंडाळलं.

यानंतर भारतीय फलंदाजांनी आपल्या पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी केली. रहाणे शतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 326 धावा करत ऑस्ट्रेलियावर 131 धावांची आघाडी मिळवली.

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. तिसऱ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज माघारी परतले होते. मग पॅट कमिन्स आणि कॅमरुन ग्रीन यांच्या 57 धावांच्या भागीदारी रचली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला काहीशी झुंज दिल्यानंतर पॅट कमिन्स आणि कॅमरुन ग्रीन माघारी परतले आणि ऑस्ट्रेलियाला 200 धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आलं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे 69 धावांची आघाडी असल्यामुळे भारताला विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य मिळालं. ते भारताने आठ विकेट्स राखून पार केलं.

संबंधित बातम्या

IND Vs AUS 2nd Test | भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं 70 धावांचं आव्हान

IND Vs AUS 2nd Test | बॉक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवसही भारताने गाजवला, ऑस्ट्रेलिया 6/133

INDvsAUS : कर्णधार अजिंक्य रहाणेचे शानदार शतक, टीम इंडिया सुस्थितीत

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget