एक्स्प्लोर

INDvsAUS : कर्णधार अजिंक्य रहाणेचे शानदार शतक, टीम इंडिया सुस्थितीत

INDvsAUS Boxing Day Test : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटीत पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावत टीम इंडियाला सुस्थितीत नेलं आहे. रहाणेनं जाडेजासोबत शतकी भागीदारी केली. दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी रहाणे 104 तर जाडेजा 40 धावांवर खेळत आहेत.

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतलं 12 वं शतक झळकावत टीम इंडियाला मोठ्या आघाडीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. अजिंक्यला दुसऱ्या दिवशी हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा यांनी साथ दिली. रहाणेनं जाडेजासोबत शतकी भागीदारी केली. पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी रहाणे 104 तर जाडेजा 40 धावांवर खेळत आहेत. भारताने पहिल्या डावात आतापर्यंत 82 धावांची आघाडी घेतली आहे.

आजच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर शुभमन गिल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. त्यानंतर पुजारा 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहाणेने हनुमा विहारी (21), ऋषभ पंत (29) यांच्यासोबत छोट्या भागीदाऱ्या करत संघाला सुस्थितीत नेले. पंत बाद झाल्यानंतर आलेल्या जाडेजाने रहाणेला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क, कमिन्सने दोन-दोन तर लायनने एक विकेट घेतली.

पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली होती. जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. बुमराहला रविचंद्रन अश्विन आणि पदार्पण केलेल्या मोहम्मद सिराजनं चांगली साथ दिली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात मयांक अगरवालच्या रुपात धक्का बसला होता. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला.

सलामीवीर बर्न्स शून्यावर बुमराहचा शिकार ठरला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशनेनं सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. त्यानंतर हेडनं 38 तर वाडेनं 30 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून बुमराहनं चार, अश्विननं 3, सिराजनं 2 तर रविंद्र जाडेजानं एक विकेट घेतली. टीम इंडिया दुसऱ्या कसोटी समान्यात विराट कोहलीशिवाय मैदानात उतरली आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 06 PM TOP Headlines 6 PM 06 November 2024 | एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर | ABP Majha | 06 NOV 2024Muddyache Bola Tuljapur : तुळजापुरात 'जरांगे फॅक्टर' महत्त्वाचा ठरेल ? : मुद्द्याचं बोलाYogi Adityanath Amravati : एकत्र राहिलात तर कुणाची हिम्मत होणार नाही दगडफेक करायची :योगी आदित्यनाथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
PM Vidya Lakshmi Yojana : उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
Embed widget