एक्स्प्लोर

IND Vs AUS | बुमराहची धारदार गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला

IND Vs AUS 2nd Test Match LIVE : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला.

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. बुमराहला रविचंद्रन अश्विन आणि पदार्पण केलेल्या मोहम्मद सिराजनं चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. सलामीवीर बर्न्स शून्यावर बुमराहचा शिकार ठरला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशनेनं सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. त्यानंतर हेडनं 38 तर वाडेनं 30 धावांची खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांपुढं ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही.

टीम इंडियाकडून बुमराहनं चार, अश्विननं 3, सिराजनं 2 तर रविंद्र जाडेजानं एक विकेट घेतली. टीम इंडिया दुसऱ्या कसोटी समान्यात विराट कोहलीशिवाय मैदानात उतरली आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. विराट कोहलीच्या जागी अष्टपैलू रवींद्र जाडेजाला संधी मिळाली आहे. तर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिलला स्थान देण्यात आहे. या सामन्याद्वारे शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. दुखापत झाल्याने मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. त्याने या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं आहे. याशिवाय भारतीय संघाने रिद्धीमान साहाच्या जागी रिषभ पंतला परत बोलावलं आहे.

तर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. डेविड वॉर्नर या सामन्यासाठी फिट नव्हता. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून जो बर्न्ससह मॅथ्यू वेड यांनी सलामीची जबाबदारी स्वीकारली होती.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर अतिशय दबाव आहे, कारण पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा डाव केवळ 36 धावांवर आटोपला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget