VIDEO : रडत रडत सर्वांना नमस्कार, वडिलांना मिठी! टीम इंडिया जिंकल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जसोबत डीवाय पाटील स्टेडियमवर रात्री नेमकं काय घडलं?
Jemimah Rodrigues Emotional Video : भारतीय महिला क्रिकेटमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज हे नाव आधीपासूनच ओळखीचं होतं, पण आता ते नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरलं गेलं आहे.

Jemimah Rodrigues Emotional Video : भारतीय महिला क्रिकेटमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज हे नाव आधीपासूनच ओळखीचं होतं, पण आता ते नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरलं गेलं आहे. महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय जेमिमाच्या अफलातून खेळीमुळे शक्य झाला. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर तिने जे साध्य केलं, त्याने केवळ भारतीय क्रिकेटप्रेमींचंच नाही तर तिच्या वडिलांचंही छाती अभिमानाने भरून आलं. सामना संपल्यानंतर जेव्हा बाप लेकीची भेट झाली, तो क्षण खुपच भावनिक होता.
THIS IS WHAT IT MEANS! 💙🥹
— Star Sports (@StarSportsIndia) October 30, 2025
👉 3rd CWC final for India
👉 Highest-ever run chase in WODIs
👉 Ended Australia's 15-match winning streak in CWC#CWC25 Final 👉 #INDvSA | SUN, 2nd Nov, 2 PM! pic.twitter.com/8laT3Mq25P
रडत रडत सर्वांना नमस्कार, वडिलांना मिठी!
भारताला विजय मिळवून दिल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात जेमिमा आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारून रडताना दिसते. तिच्या डोळ्यांतील ते अश्रू दु:खाचे नाही, तर अभिमानाचे होते. एका वडिलांच्या स्वप्नपूर्तीचे, एका मुलीच्या कष्टाचे फळ मिळाल्याचे. या दिवसासाठीच तिच्या वडिलांनी तिला खेळाडू बनवलं होतं, आणि या दिवसासाठीच जेमिमाने बॅट हातात घेतली होती. विजयाच्या त्या क्षणी दोघांनाही भावना आवरल्या नाहीत. वडिलांना मिठी मारल्यानंतर जेमिमा आपल्या आईच्या कुशीत शिरली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी मैदानात रडत रडत जेमिमा रॉड्रिग्जने सर्वांना नमस्कार केला.
View this post on Instagram
जेमिमा रॉड्रिग्ज काय म्हणाली?
सेमीफायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलेली जेमिमा रॉड्रिग्ज सामन्यानंतर म्हणाली की, “सर्वात आधी मी देवाचे आभार मानते, कारण हे सर्व मी एकटीने करू शकत नव्हते. मला माहित आहे, आजच्या या कठीण प्रसंगातून देवानेच मला बाहेर काढले. माझे आई-वडील, कोच आणि ज्यांनी या काळात माझ्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचे मी आभार मानते. गेले चार महिने खूप कठीण गेले, पण आज जे घडले ते एखाद्या स्वप्नासारखे वाटते, अजूनही विश्वास बसत नाही.”
#JemimahRodrigues, take a bow! 🙌#CWC25 Final 👉 #INDvSA | SUN, 2nd Nov, 2 PM! pic.twitter.com/2Ov9ixC7Ai
— Star Sports (@StarSportsIndia) October 30, 2025
जेमिमाची ऐतिहासिक खेळी
उपांत्य फेरीत भारतासमोर 339 धावांचं आव्हान होतं. महिला वनडे वर्ल्ड कप इतिहासातील हे सर्वात मोठं लक्ष्य होते. 13 धावांवर शेफाली वर्मा आणि 59 धावांवर स्मृती मानधना बाद झाल्यानंतर संघ संकटात सापडला होता. पण याच निर्णायक क्षणी जेमिमा रॉड्रिग्जने जबाबदारी घेतली आणि एक अविस्मरणीय डाव खेळला. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेली जेमिमा शेवटपर्यंत नाबाद राहिली. भारताने 48.3 षटकांत 5 बाद 341 धावा करून विजय मिळवला आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. जेमिमाने 134 चेंडूत 14 चौकारांसह नाबाद 127 धावा ठोकल्या. तिच्या या अद्वितीय खेळीसाठी तिला “प्लेअर ऑफ द मॅच” पुरस्कार मिळाला.
हे ही वाचा -














