IND vs AUS 2nd T20 Score : भारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा खेळ, गोलंदाजीही फिकी; ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या टी-20 मध्ये 4 विकेट्सनी विजय
Australia vs India, 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना कॅनबेराच्या पावसात धुळीस मिळाला.
LIVE

Background
India vs Australia 2nd T20I Match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना कॅनबेराच्या पावसात धुळीस मिळाला. आता सगळ्यांचे लक्ष मालिकेतील दुसऱ्या टी20 कडे लागले आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या मैदानावर हा सामना रंगणार असून, हवामानाने अडथळा आणला नाही तर सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
IND vs AUS 2nd T20 Score : भारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा खेळ, गोलंदाजीही फिकी; ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या टी-20 मध्ये 4 विकेट्सनी विजय
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी दिलेले 126 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकांत सहा गडी गमावून गाठले. या विजयासह कांगारूंनी पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता तिसरा सामना 2 नोव्हेंबरला खेळवला जाईल.
IND vs AUS 2nd T20 Live Score : अभिषेकची अर्धशतकी खेळी, बाकी सगळे नापास! भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 126 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या अपडेट्स
दुसऱ्या टी-20 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियासमोर 126 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला 18.4 षटकांत 125 धावांत गुंडाळले. भारताची सुरुवात खराब झाली, 50 धावांपेक्षा कमी धावांत पाच विकेट गमावल्या. पण, अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला सावरले आणि भारताला 120 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.




















