IND Vs AUS, Innings Highlights: श्रेयस-गिलची शतके, सूर्या-राहुलचा फिनिशिंग टच, भारताचा 399 धावांचा डोंगर
IND Vs AUS, Innings Highlights : ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ४०० धावांचे आव्हान, श्रेअयस अय्यर आणि गिलची शतके
IND Vs AUS, Innings Highlights : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. निर्धारित ५० षटकात भारताने पाच बाद ३९९ धावांचा डोंगर उभारला. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी वादळी शतके ठोकली. तर केएल राहुलने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव याने फिनिशिंग टच दिला. ऑस्ट्रेलियाकडून एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ४०० धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
अय्यरचे दमदार शतक -
ऑस्ट्रेलियाविरोधात इंदौर वनडे सामन्यात श्रेयस अय्यरने शानदार शतक ठोकले. विश्वचषकापूर्वी श्रेयस अय़्यरने वादळी फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. दुखापतीमुळे अय्यर सहा महन्यापासून क्रिकेटपासून दूर होता. आशिया चषकात त्याने कमबॅक केले. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यातच दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्यामुळे अय्यरला अखेरच्या तीन सामन्यात बाहेर बसावे लागले होते. पण आता ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरने वादळी फलंदाजी केली. इंदौर वनडे सामन्यात श्रेयस अय्यरने 86 चेंडूत शतक ठोकले. श्रेयस अय्यरचे हे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. या शतकासह श्रेयस अय्यरने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आपला फॉर्म परत आल्याचे दाखवले आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर लगेचच श्रेयस अय्यर तंबूत परतला. श्रेयस अय्यरने 90 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले. यापूर्वी मोहाली वनडेत श्रेयस अय्यर लवकर बाद झाला होता. मात्र या सामन्यात शानदार पुनरागमन करत शतक ठोकले.
गिलचे वादळ -
कांगारुंच्या गोलंदाजाविरोधात गिलची बॅट तळपली. पहिल्या वनडे सामन्यात गिलने अर्धशतक ठोकले होते. आता दुसऱ्या वनडेत शतकी तडाका लावला. गिलने ९२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकी खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. शुभमन गिलने ३५ व्या वनडे सामन्यात सहावे शतक ठोकले. त्याने ३५ डावात आतापर्यंत १९०० धावा चोपल्या आहेत. गिलने एकदिवसीय सामन्याच्या ३५ डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून रेकॉर्ड केला आहे. या शतकासह गिलने यावर्षी वनडेत १२०० धावांचा आकडाही गाठला आहे.
गिल-अय्यरमध्ये द्विशतकी भागिदारी -
ऋतुराज गायकवाड झटपट तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शुभमन गिल आणि अय्यर दोघांनीही शतके ठोकली. अय्यर आणि गिल यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी झाली. १६४ चेंडूमध्ये या दोघांनी द्विशतकी भागिदारी केली.
भारताची खराब सुरुवात -
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 16 धावांच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. भारताचा डाव गडगडणार की काय असेच वाटत होते. पण यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारताच्या दोन्ही फलंदाजांनी सहज धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी झाली.
केएल राहुलचे अर्धशतक
केएल राहुल याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. राहुलने ३८ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या खेळीत राहुलने तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले. केएल राहुल याने आधी ईशान किशनसोबत अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादव याच्यासोबतही अर्धशतकी भागिदारी केली. इशान किशन किशन याने १८ चेंडूत झटपट ३१ धावांचे योगदान दिले. या खेळीत किशन यान दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले.
सूर्याचा फिनिशिंग टच -
सूर्यकुमार यादव याने दुसऱ्या सामन्यातही अर्धशतक ठोकले. इंदौरच्या मैदानावर सूर्याने षटकारांची बरसात केली. सूर्याने ३७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी करत फिनिशिंग टच दिला. सूर्याने या खेळीत सहा षटकार आणि सहा चौकार मारले.