IND vs AUS 1st Test : दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला, भारत 144 धावांच्या आघाडीने मजबूत स्थितीत, जाडेजा-अक्षरचं अर्धशतक पूर्ण
IND vs AUS 1st Test Day 2 Highlights : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला असून भारताने 7 गडी गमावत 321 धावा केल्या आहेत. सध्या जाडेजा आणि अक्षर अर्धशतक ठोकून क्रिजवर आहेत.
IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) पहिला कसोटी सामना (India vs Australia 1st Test) सुरु असून दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला आहे. दिवसअखेर भारताने 7 गडी गमावत 321 धावा ठोकल्या आहेत. पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारत 77 वर 1 बाद अशी अवस्था असताना दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहितच्या शतकानंतर अक्षर आणि जाडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 144 धावांची आघाडी घेतली आहे.
View this post on Instagram
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडली. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारताने अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा हा मनसुबा हाणून पाडला. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेनने 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजने बाद केलं. पण त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे 8 गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी सर्वात कमाल गोलंदाजी करणाऱ्या जाडेजाने 5 विकेट्स घेतल्या.
रोहितचं दमदार शतक
177 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपल्यावर भारताकडून फलंदाजीला आलेल्या कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. आल्याआल्या चौकार मारण्यास त्यानं सुरुवात केली. ज्यामुळे पहिला दिवस संपताना भारतानं 77 धावांपर्यंत मजल मारली. केएल राहुल 20 धावा करुन बाद झाला होता तर रोहित नाबाद 56 धावांवर क्रिजवर होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विन, विराट, केएस भरत, सूर्यकुमार, पुजारा हे सर्वजण स्वस्तात माघारी परतले. रोहितनं 120 धावा करत दमदार शतक ठोकलं. तसंच ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीने तब्बल 5 फलंदाजांना तंबूत धाडलं. याशिवाय नॅथन लियॉन आणि पॅट कमिन्स यांनीही एक-एक विकेट घेतली. दरम्यान भारताचे स्टार अष्टपैलू जाडेजा आणि अक्षर अनुक्रमे 66 आणि 52 धावांवर क्रिजवर आहेत.
रोहितचा अनोखा विक्रम
सामन्यात रोहितने शतक झळकावताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (ODI, Test आणि T20) शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये केवळ चार खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. रोहितपूर्वी बाबर आझम, दिलशान आणि फाफ डू प्लेसिस यांनी हा पराक्रम केला आहे. दरम्यान रोहितने शतक झळकावताच मैदानात उपस्थित सर्वांनीच त्याचं टाळ्या वाजवून कौतुक केलं.
हे देखील वाचा-