(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Matt Renshaw Injury : ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ, आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे पोहोचला रुग्णालयात
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाच्या मॅट रॅनशॉला दुखापत झाली आहे.
IND vs AUS 1st Test : भारताविरुद्धची कसोटी मालिका (India vs Australia) सुरू होण्यापूर्वीपासून ऑस्ट्रेलियन संघाला (Team Australia) दुखापतींचे झटके मिळाले, आणि आता सामना सुरु असतानाही त्यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नागपुरातील VCA स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सराव सत्रात उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू रॅनशॉ (matt renshaw) याला स्कॅनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. दुसऱ्या दिवशी खेळण्यापूर्वी सराव करताना रॅनशॉच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. समोर आलेल्या माहितीनुसार 26 वर्षीय फलंदाज शुक्रवारी सकाळीच स्कॅनिंगसाठी स्टेडियममधून बाहेर पडला असून त्याच्या जागी अॅश्टन एगर क्षेत्ररक्षण करत होता.
ऑस्ट्रेलिया आधीच अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कशिवाय नागपूर कसोटी खेळत आहे, जोश हेझलवूड देखील अनुपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉने टिप्पणी केली, "मला माहित नाही की हे किती गंभीर आहे, परंतु रॅनशॉ तो मैदानावर नसणं हे संघासाठी चांगलं नाही." मला मिळालेल्या माहितीनुसार त्याला सावधगिरीचा उपाय म्हणून स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाला त्याची गरज आहे, त्यामुळे ही दुखापत ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का ठरु शकते.
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सिडनी कसोटीत कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या रॅनशॉने नागपुरातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या सामन्यात स्थान मिळवलं. ट्रॅव्हिस हेड उपलब्ध नसल्याने पीटर हँड्सकॉम्बलाही मधल्या फळीत फलंदाजीसाठी बोलावण्यात आलं. पहिल्या डावात अवघ्या 177 धावांत गुंडाळल्यानंतर नागपूर कसोटीत पुनरागमन करण्याचं उद्दिष्ट असल्याने दुसऱ्या डावात रॅनशॉची फलंदाजी ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची आहे. पहिल्या डावात तो खातंही खोलू शकला नव्हता.
कसा होता ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव?
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पहिल्या डावाचा विचार करता सर्वात आधी नाणेफेक (Toss Update) जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारताने अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा हा मनसुबा हाणून पाडला. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेनने 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजने बाद केलं. पण त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे 8 गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी सर्वात कमाल गोलंदाजी करणाऱ्या जाडेजाने 5 विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-