IND vs AUS, 1st T20I, 1st Inning : राहुल-पंड्याची अर्धशतकं, सूर्याची तुफान खेळी, धावसंख्या 200 पार, ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचं आव्हान
India vs Australia T20 : मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरु भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यात भारताने दमदार फलंदाजीचं दर्शन घडवलं आहे.
India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यात सुरु पहिल्या टी20 सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. यावेळी भारताचा सलामीवीर केएल राहुल, स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (KL Rahul and Hardik Pandya) यांनी अर्धशतकं झळकावली आहेत. दुसरीकडे सूर्यकुमारनेही (Suryakumar yadav) 46 धावांची तगडी खेळी केली आहे.
सामन्यात सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती कांगारुनी आखली होती. त्या हेतूने त्यांची सुरुवातही चांगली झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (11), माजी कर्णधार विराट कोहली (2), दोघेही स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने केएल राहुलसोबत डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या 100 पार नेली. पण अर्धशतक करुन राहुल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दीक पंड्या क्रिजवर आल्यावर त्यानेही चांगली फलंदाजी केली. पण तोवर सूर्या 46 धावा करुन बाद झाला. मग हार्दीकने एकहाती तुफान फलंदाजी करत 30 चेंडूत नाबाद 71 धावा ठोकल्या आणि धावसंख्या 208 पर्यंत नेत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले आहे.
कशी आहे दोघांची अंतिम 11?
भारतीय संघाचा विचार करता इंडियाने जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली आहे. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात खेळेल, असं रोहितनं नाणेफेकीदरम्यान सांगितलं. तसंच ऋषभ पंत यालाही विश्रांती देत संघाबाहेर ठेवलं आहे. विशेष म्हणजे अनुभवी गोलंदाज उमेश यादव जवळपास 43 महिन्यानंतर आंतरराष्ट्री टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. तसंच यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक संघात आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात टीम डेव्हीड फायनली पदार्पण करत आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे ते पाहूया...
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, उमेश यादव
ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिन्स, जोस हेजलवुड, नथन एलिस.
चेसिंग करणं सोपं
पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर 2018 पासून आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये सातवेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर आहे. ज्यामुळे आजही नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
हे देखील वाचा-