एक्स्प्लोर

विराट, संजू शून्यावर तंबूत, भारताची भक्कम फलंदाजी ढेपाळली, 22 धावांत 4 जण तंबूत

IND vs AFG 3rd T20 Live Score: तिसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अफगाण गोलंदाजीसमोर भारताची भक्कम फलंदाजी ढेपाळली.

IND vs AFG 3rd T20 Live Score: तिसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अफगाण गोलंदाजीसमोर भारताची भक्कम फलंदाजी ढेपाळली. फक्त 22 धावांत भारताचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले. विराट कोहली आणि संजू सॅमसन यांना खातेही उघडता आले नाही. 

अफगाणिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे तगडे फलंदाज ढेपाळले. विराट कोहलीला तर खातेही उघडता आले नाही. त्याशिवाय तिसऱ्या टी 20 सामन्यात संधी मिळालेला संजू सॅमसनही अपयशी ठरला. संजू सॅमसन यालाही खातेही उघडता आले नाही. टी 20 विश्वचषकापूर्वी होत असलेल्या अखेरच्या टी 20 सामन्यात दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. 

दुसऱ्या सामन्यात विजयाचे शिल्पकार ठरलेले शिवम दुबे आणि यशस्वी जायस्वाल यांनाही मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जायस्वाल फक्त चार धावा काढून तंबूत परतला. तर शिवम दुबे याने फक्त एक धाव काढली. दुसऱ्या सामन्यात या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत अर्धशतके ठोकली होती. पण बेंगलोरच्या मैदानात या फलंदाजांना अपयश आले.

अफगाणिस्तानकडून फरीद अहमद याने अचूक टप्प्यावर मारा केला. त्याने तीन षटकात फक्त 10 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. फरीद याने विराट कोहली, यशस्वी जायस्वाल आणि संजू सॅमसन यांना गुंडाळले. तर उमरजई याने शिवब दुबे याचा अडथळा दूर केला. सहा षटकांमध्ये भारताने फक्त 30 धावा केल्या असून चार फलंदाज बाद झाले आहेत. रिंकू सिंह आणि रोहित शर्मा यांच्यावर भारताची मदार आहे.

भारताची प्लेईंग 11 -

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान 

 रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), इब्राहिम जादरान (कर्णधार), गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, शराफुद्दीन अशरफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम सफी, फरीद अहमद मलिक

मालिकेत भारताचे निर्वादित वर्चस्व - 

तीन सामन्याच्या टी 20 मलिकेत भारताने निर्वादित वर्चस्व गाजवलं. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात अफगाण संघाचा पराभव केला. भारताकडून शिवब दुबे याने अष्टपैलू कामगिरी केली. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रभावी मारा केला. कर्णधार रोहित शर्मा याला फलंदाजीत अपयश आले. दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झालाय. अखेरच्या सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी करण्याची संधी असेल. आयपीएलपूर्वी भारताचा हा अखेरचा टी 20 सामना असेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget