एक्स्प्लोर

IND L vs SA L:  सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांमध्ये नाराजी; अवघ्या 16 धावांत परतला माघारी

Road Safety World Series 2022: इंडिया लीजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स (India Legends vs South Africa Legends) यांच्यात रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामातील पहिला सामना खेळला जात आहे.

Road Safety World Series 2022: इंडिया लीजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स (India Legends vs South Africa Legends) यांच्यात रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामातील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंडिया लीजेंड्सच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) गेल्या अनेक वर्षांनंतर मैदानात खेळताना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिका लीजेंड्सविरुद्ध सचिनच्या बॅटीतून धावांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु, सचिन तेंडुलकर अवघ्या 16 धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे. 

दिर्घकाळानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणाऱ्या सचिन तेंडुलकरला दक्षिण आफ्रिका लीजेंड्सविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्यानं 15 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीनं 16 धावा केल्या. मखाया एनथिनीच्या गोलंदाजीवर सचिन तेंडुलकरनं आपली विकेट्स गमावली. सचिन बाद झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये काहीशी निराशा पाहायला मिळाली. परंतु, पुढच्या सामन्यात सचिन धमाकेदार फलंदाजी करेल आणि मोठी धावसंख्या करेल, अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचं स्वरूप
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात आठ संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा आजपासून येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. या स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रत्येक संघ 5-5 सामने खेळेल. या स्पर्धेतील पहिला 7 सामने कानपूरमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यानंतर इंदूरमध्ये 5 सामने, डेहराडूनमध्ये 6 आणि रायपूरमध्ये 2 सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील टॉपच्या चार संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. ज्यातील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 1 ऑक्टोबरला होणार आहे.

संघ-

इंडिया लीजेंड्स प्लेईंग इलेव्हन:
सचिन तेंडुलकर (कर्णधार), नमन ओझा (विकेट किपर), सुरेश रैना, युवराज सिंह, युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, मनप्रीत गोनी, मुनाफ पटेल, राहुल शर्मा, प्रज्ञान ओझा. 

दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन:
हेन्री डेव्हिड्स, मॉर्न व्हॅन विक (विकेटकिपर), अल्विरो पीटरसन, जॅक रुडॉल्फ, जॉन्टी रोड्स (कर्णधार), जोहान बोथा, एडी ली, जोहान व्हॅन डर वॅथ, गार्नेट क्रुगर, मखाया एनथिनी, अँड्र्यू पुटीक.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Raj Thackeray House Monkey: राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
Rohit Sharma on Gautam Gambhir: तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Embed widget