(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA, 2nd T20, Pitch Report : गुवाहाटीच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तीन टी20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणारा हा सामना सुरु होण्याआधी मैदानाची स्थिती जाणून घेऊ...
IND vs SA, 2nd T20 : आगामी टी20 विश्वचषकापूर्वी भारत आपली अखेरची टी20 मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आज दुसरा टी20 सामना गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत आघाडी घेतली असून आज भारताला मालिकाविजयाची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिका आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न नक्कीच करेल. दरम्यान अशामध्ये आजचा सामना होणाऱ्या मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीचा विचार करता हे एक नवीन स्टेडियम आहे. याठिकाणी आतापर्यंत फक्त दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. बरासपरा स्टेडियमची खेळपट्टी ही काहीशी बॅटिंग फ्रेंडली असल्याने खेळाडूंना याठिकाणी धावा करताना अधिक मदत होऊ शकते. पण आजवरची सरासरीॉ 160 इतकीच असल्याने जास्त हायस्कोरिंग सामना होण्याची शक्यता कमी आहे. पण सामना चुरशीचा आणि रंगतदार होण्याची दाट शक्यता आहे.
कसा आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आजवरचा इतिहास?
भारत आणि दक्षिण आफ्रिका(India vs South Africa T20 Record) यांच्यात आतापंर्यंत 21 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 12 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिका संघाला 8 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित देखील ठरला आहे.
संभाव्य भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर
संभाव्य दक्षिण आफ्रिका संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, ट्रिस्टन स्टब्स.
हे देखील वाचा -