(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs New Zealand : आज भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना, मैदानाची स्थिती, संभाव्य अंतिम 11 सर्वकाही एका क्लिकवर
IND vs NZ : भारतीय संघ सध्या विश्वचषकानंतर आता पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून समोर न्यूझीलंड संघाचं आव्हान असणार आहे.
India vs New Zealand : टी20 विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारत सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून यावेळी तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे खेळवला जाऊ शकला नाही. ज्यानंतर आज (20 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल मैदानात खेळवला जाणार आहे. तर या सामन्यावेळी मैदानाची स्थिती, संभाव्य संघ हे सारं काही जाणून घेऊया...
सामना होणाऱ्या बे ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि त्यामुळे येथे फलंदाजांना मदत होईल अशी अपेक्षा आहे. सामन्याच्या दुसऱ्या भागाच वेगवान गोलंदाजांना काही मदत मिळू शकते, तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.
कसे असतील संघ?
तर भारतीय संघाचा विचार करता विश्वचषक खेळलेल्या रोहित-विराट या दिग्गजांना विश्रांती दिली गेली आहे. गोलंदाजीतही शमी नसून बुमराहही दुखापतीमुळे बाहेरच आहे. अशामध्ये संजू, श्रेयस, शुभमन अशा बऱ्याच जणांचं पुनरागमन झाल्यामुळे एक नवी प्लेईंग 11 आज दिसणार आहे. यामध्ये सलामीला शुभमन आणि ईशान असू शकतात. त्यानंतर इनफॉर्म सूर्या विराटची जागा घेईल. तर चौथ्या स्थानावर श्रेयस आणि संजू यांच्यातील एकजण असेल. तर त्यानंतर कॅप्टन हार्दिक, पंत हे दिग्गज असतील. मग सुंदर आणि हुडा यांच्यातील एकजण असू शकतो. तर गोलंदाजीत चहल या एका फिरकीपटूसह अर्शदीप, उमरान आणि भुवनेश्वर हे वेगवान गोलंदाज असू शकतात.
संभाव्य भारतीय संघ :
शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर/दीपक हुडा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड संघाचा विचार करता ते विश्वचषकात घेऊन उतरलेल्या संघासोबतच उतरु शकतात, ज्यात काहीच बदल असू शकतात. कर्णधार म्हणून केनच असेल तर ग्लेन हा कमाल फॉर्मात असल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
असा असू शकतो न्यूझीलंडचा संघ -
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
हे देखील वाचा-