IND vs BAN, Weather Report : भारत-बांगलादेश सामन्यांना होणार सुरुवात, पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार का?
IND vs BAN : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तीन पैकी दोन सामने पावसामुळे होऊ शकले नाही आता बांगलादेश दौऱ्यात काय परिस्थिती असेल याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष आहे.
IND vs BAN, 1st ODI, Weather Report : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून उद्या अर्थात 4 डिसेंबर रोजी भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. याआधी न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या तीन पैकी दोन सामन्यांचा पावसामुळे निकाल आला नाही. ज्यामुळे 1-0 अशा फरकाने भारताने मालिका गमावली. आता बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पावसाचा व्यत्यय येऊ नये अशी आशा क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. तर पहिल्या सामन्यात पाऊस येईल का? हा प्रश्न अनेकांसमोर असून यासाठी नेमकी हवामानाची स्थिती कशी आहे, पाहूया...
सामना होणाऱ्या मीरपूरमधील हवामान उबदार आणि स्वच्छ असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Weather.com ने दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी सामना होणाऱ्या शेर ए बांग्ला मैदानातील तापमान दिवसा 29 अंश सेल्सिअस असेल. तर आर्द्रता 57% असेल विशेष म्हणजे पावसाची शक्यता फक्त 4% आहे. त्यामुळे सामन्यावेळी पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
कधी, कुठे पाहू शकता सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना (India vs Bangladesh 1st ODI) भारतीय वेळेनुसार 4 डिसेंबरला सकाळी 11.30 वाजता खेळवला जाणार आहे. सामना ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
कशी असू शकते बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची अंतिम 11?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), अक्षर पटेल , शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, उमरान मलिक.
बांगलादेशची संभाव्य अंतिम 11
अनामूल हक, लिटन दास (कर्णधार), शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मोसाद्देक हुसेन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान
हे देखील वाचा-