(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS, 2nd T20, Pitch Report : नागपूरच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पार पडणारा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
IND vs AUS, 3rd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आज दुसरा टी20 सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यामुळे आजचा सामना ऑस्ट्रेलिया जिंकल्यास ते मालिका जिंकतील तर भारत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न नक्कीच करेल. दरम्यान अशामध्ये आजचा सामना होणाऱ्या मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाच्या (Vidarbha Cricket Association Stadium) खेळपट्टीचा विचार करता हा पिच बॅटिंग फ्रेंडली आहे. म्हणजेच आजही पहिल्या सामन्याप्रमाणे एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. दरम्यान दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. तर फिरकीपटू मिडल ओव्हर्समध्ये कमाल करु शकतात. भारताने या मैदानावर खेळलेल्या दोन्ही आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारत याठिकाणची विजयी मालिका कायम ठेवेल, की पहिल्या सामन्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया कमाल करु विजय मिळवले हे पाहणं औत्सुक्याचं राहील.
कसा आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आजवरचा इतिहास?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia T20 Record) यांच्यात आतापंर्यंत 24 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित देखील ठरला.
संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिंस, जोस हेजलवुड, सीन एबॉट.
महत्वाच्या बातम्या :