Sarfaraz Khan : 6 कसोटी मॅचनंतर वनवास... सरफराज अखेर बोललाच! 16 शब्दांच्या पोस्टमधून सांगितली सगळी कहाणी, काय म्हणाला?
Sarfaraz Khan Post News : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर अनेक खेळाडूंच्या निवडीवर चर्चा रंगली आहे.

Sarfaraz Khan Post News : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर अनेक खेळाडूंच्या निवडीवर चर्चा रंगली आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे मुंबईचा फलंदाज सरफराज खान आहे. यादरम्यान संघात स्थान न मिळाल्यानंतर सरफराजने सोशल मीडियावर केलेल्या एका क्रिप्टिक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही पोस्ट श्रीलंका दौऱ्यासाठी संधी न मिळाल्याची नाराजी व्यक्त करणारी असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. मात्र, सरफराजने आपल्या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा किंवा निवड समितीचा थेट उल्लेख केलेला नाही.
इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण
सरफराज खानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका चित्रपटातील सीन शेअर करत त्यावर एक भावनिक संदेश लिहिला. त्याने म्हटले, "कदाचित मी या चौकटीत बसत नसेन, पण माझ्यात जितकी ताकद आहे, त्या जोरावर मी लढत राहीन." या एका वाक्यामुळे सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. अनेक चाहत्यांनी ही पोस्ट श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याची प्रतिक्रिया असल्याचे म्हटले आहे. काहींनी मात्र याकडे सरफराजच्या पुनरागमनाच्या जिद्दीचा संदेश म्हणून पाहिले आहे.
🚨🚨 Sarfaraz Khan Instagram story , he posted something similar when CSK brought him in the auction last year.
— MSDian™ (@Kushal_MSD) August 6, 2026
➡️ Jersey 2 🏏 is he hinting about getting traded to another team ?? pic.twitter.com/etcto7AGs1
शेवटचा सामना नोव्हेंबर 2024 मध्ये
सरफराज खान भारतीय संघासाठी अखेरचा सामना नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात सातत्याने संधी मिळालेली नाही. श्रीलंका दौऱ्यासाठीही त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याच्या भविष्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडल्यानंतर सरफराज खानला 2024 मध्ये अखेर भारताकडून कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्ध राजकोट येथे झालेल्या पहिल्याच कसोटीत त्याने दोन्ही डावांत शानदार अर्धशतके झळकावली. पहिल्या डावात 62, तर दुसऱ्या डावात नाबाद 68 धावा करत त्याने आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. मात्र, या दोन्ही अर्धशतकांचे शतकात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याने एकूण सहा कसोटी सामने खेळले, पण अवघ्या दहा महिन्यांतच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ब्रेक लागला.
फिटनेसवर मेहनत, वजनही घटवलं
सरफराज खानला अनेकदा वाढत्या वजनामुळे टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत त्याने फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रित केले. कठोर सराव आणि डाएटच्या जोरावर त्याने सुमारे 10 किलो वजन कमी केले. अधिक तंदुरुस्त होण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांचे क्रिकेट वर्तुळातूनही कौतुक झाले. भारतीय संघातून बाहेर असला तरी सरफराजची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी मात्र सातत्याने प्रभावी राहिली आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामात त्याने हैदराबादविरुद्ध तब्बल 227 धावांची मॅरेथॉन खेळी साकारत पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आकडेही प्रभावी आहेत. सरफराजने 62 प्रथम श्रेणी सामन्यांत 17 शतके आणि 16 अर्धशतके झळकावली आहेत. तर 43 लिस्ट-ए सामन्यांत 3 शतके आणि 2 अर्धशतकांची नोंद त्याच्या नावावर आहे.
हे ही वाचा -




















