एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 : शिखर धवनला पर्याय कुणाचा? ऋषभ पंतला संधी मिळणार?

शिखर धवनच्या दुखापतीवर घाईघाईने निर्णय न घेता धवन इंग्लंडमध्येच थांबेल असा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

लंडन : ऐन विश्वचषकातच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी विश्वचषकाबाहेर जावं लागलं आहे. या धक्क्यानंतर भारतीय संघव्यवस्थानाने शिखर धवनच्या दुखापतीबाबत वेट अँड वॉच धोरण स्वीकारलं आहे. तरी बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्वचषकासाठी सज्ज राहायला सांगण्यात आलं आहे.

शिखर धवन आता तीन आठवड्यांपर्यंत एकही सामना खेळू शकणार नाही. याचा अर्थ असा की 13 जून रोजी न्यूझीलंड आणि 16 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यांआधी टीम इंडियासाठी हा मोठा झटका आहे. टीम इंडियाचे फिजियो पॅट्रिक फरहार्ट धवनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. तो विशिष्ट मुदतीत तंदुरुस्त होणं शक्य नाही, असं लक्षात आलं की, धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंतच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असं सूत्रांच्या माहितीनुसार कळतं आहे.

शिखर धवनच्या दुखापतीवर बीसीसीआयने दुखापत काळात धवन इंग्लंडमध्येच थांबणार असून वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीची देखरेख करत असल्याची माहिती दिली आहे. शिखर धवन दुखापतीच्या काळात भारतीय संघाबरोबरच असेल असं स्पष्ट केलं आहे. तसेच धवनला पर्यायी बदली खेळाडू म्हणून भारतातून कोण रवाना होणार याबाबत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण धवनच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यास ‘स्टॅंड-बाय’ खेळाडू असलेल्या ऋषभ पंतला तयारीत राहण्याच्या सुचना दिलेल्याली माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राखीव खेळाडूंमध्ये नसलेल्यांपैकी अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरच्या नावाची चर्चा आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलाचा उसळता चेंडून धवनच्या अंगठ्याला लागला. अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं. नॉटिंग्घममध्ये आज झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget