एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Under-19 World Cup | भारत-पाकिस्तानमध्ये सेमीफायनलचा महामुकाबला
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये उपांत्य फेरीची महामुकाबला होणार आहे. या सामन्यात विजय मिळून सातव्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी भारताला आहे.
पॉचेस्ट्रूम (दक्षिण आफ्रिका) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर नाईन्टिन विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत या विश्वचषकात अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर मात करुन सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा युवा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
दोन्ही संघ सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत समोरासमोर आले आहेत. 2018 मध्ये भारताने पाकिस्तानला 203 धावांनी पराभूत केलं होतं. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी 4-4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
भारतीय संघाने जर उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं तर संघ सातव्यांदा फायनलमध्ये प्रवेश करेल. भारताचा संघ 2000 मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा भारत चॅम्पियन बनला होता. यानंतर 2006 मध्ये उपविजेता, 2008 मध्ये विजेता, 2012 मध्ये विजेता, 2016 मध्ये उपविजेता आणि 2018 मध्ये विजेता बनला होता. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ पाच वेळा अंतिम फेरीत दाखल झाला आहे. पाकिस्तानने 2004 आणि 2006 मध्ये विजेतेपदावर नाव कोरलं होतं. तर 1988, 2010 आणि 2014 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
स्पर्धेतील दोन्ही संघांचा प्रवास
भारताने या स्पर्धेत सर्वात आधी श्रीलंकेला पराभूत केलं. त्यानंतर जपान आणि न्यूजीलंडविरुद्ध विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली. दुसरीकडे पाकिस्तानने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडला हरवलं. यानंतर झिम्बाब्वेवर मात केली. बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झालं. तर उपांत्यपूर्वी सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला.
अंडर-19 विश्वचषकाच भारत विरुद्ध पाकिस्तान
वर्ष निर्णय
1988 पाकिस्तानचा 68 धावांनी विजय
1998 भारताचा 5 विकेट्सनी विजय
2002 पाकिस्तानचा 2 विकेट्सनी विजय
2004 (उपात्यं) पाकिस्तानचा 5 विकेट्सनी विजय
2006 (अंतिम) पाकिस्तानचा 38 धावांनी विजय
2010 (उपांत्यपूर्व) पाकिस्तानचा 2 विकेट्सनी विजय
2012 (उपात्यंपूर्व) भारताचा एक विकेट्सनी वजय
2014 भारताचा 40 धावांनी विजय
2018 (सेमीफायन) भारताचा 203 धावांनी विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement