अंडर 19 विश्वचषकाचे बिगुल वाजले, गतविजेत्या भारताचा पहिला सामना बांगलादेशविरोधात, पाहा सर्व माहिती
ICC U19 WC Schedule : आयसीसीने अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले आहे.
ICC U19 WC Schedule : आयसीसीने अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले आहे. १३ जानेवारी रोजी सलामीचा सामना होणार आहे. गतविजेत्या भारताचा पहिला सामना बांगलादेशविरोधात होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये १४ जानेवारी रोजी कोलंबोच्या मैदानावर आमनासामना होणार आहे. अंडर १९ स्पर्धेचे आयोजन कोलंबोशिवाय इतर पाच मैदानावर करण्यात आलेय. १३ जानेवारी रोजी अंडर १९ च्या रनसंग्रमाला सुरुवात होणार आहे, तर 4 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर फायनलचा सामना होणार आहे. अंडर १९ स्पर्धेचा हा १५ वा हंगाम आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण 41 सामने होणार आहेत.
यजमान श्रीलंकेचा पहिला सामना कुणासोबत ?
अंडर १९ चा यंदाचा १५ वा हंगाम आहे. यंदा स्पर्धा श्रीलंकामध्ये होत आहे. १७ वर्षानंतर श्रीलंकामध्ये अंडर १९ विश्वचषक स्पर्धा होत आहे. २००६ मध्ये अंडर १९ विश्वचषक स्पर्धा श्रीलंकेत पार पडली होती. त्यानंतर १७ वर्षांनी आता श्रीलंकेत पुन्हा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना यजमान श्रीलंका आणि झिम्बॉव्बे यांच्यामध्ये १३ जानेवारी रोजी होणार आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरोधात १४ जानेवारी रोजी पार पडणार आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक -
गतविजेत्या भारताच्या ग्रुपमध्ये बांगलादेश, यूएसए आणि आयर्लंड या देशांचा समावेश आहे. गतविजेत्या भारताला जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे.
14 जानेवारी 2024- भारत विरुद्ध बांगलादेश
18 जानेवारी 2024- भारत विरुद्ध यूएसए
20 जानेवारी 2024- भारत विरुद्ध आर्यरलँड
श्रीलंकामध्ये कोणत्या मैदानावर होणार सामने -
पी सारा ओव्हल मैदान
कोलंबो क्रिकेट क्लब
नॉन्देस्क्रिप्ट क्रिकेट क्लब
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब
आर. प्रेमदासा इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम
अंडर-19 वर्ल्ड कपचा भारत डिफेंडिंग चॅम्पियन
अंडर १९ विश्वचषक स्पर्धेचा भारत गतविजेता आहे. टीम इंडियाने गेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. इंग्लंडने फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 189 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात भारतीय संघाने 6 विकेट्सवर 195 धावा करत अंतिम सामना जिंकला. आता पुन्हा एकदा भारतीय संघ जेतेपदाच्या बचावासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र, भारतीय संघ जेतेपद राखण्यास सक्षम आहे की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Mark your calendars 🗓️
— ICC (@ICC) September 22, 2023
The schedule for the 2024 ICC U19 Men’s Cricket World Cup is out!#U19CWC | Details 👇https://t.co/nuy6GM0Uwc
Mark your calendars 🗓️
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) September 22, 2023
The schedule for the 2024 ICC U19 Men’s Cricket World Cup is out!#U19CWC | Details 👇https://t.co/T3935RtPa2