ICC T20 Rankings: टीम इंडियाच्या सूर्याची चमक कायम; टी-20 रँकिंगमध्ये अजूनही अव्वल स्थानी
ICC T20 Rankings: टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) चमकदार खेळी करून दाखवली.
ICC T20 Rankings: टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) चमकदार खेळी करून दाखवली. ज्याचा फायदा त्याला टी-20 रँकिंगमध्ये मिळाला. आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 फलंदाजाच्या ताज्या क्रमावारीनुसार, सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर कायम आहे. सूर्यकुमार यादवचे 859 गुण आहेत. टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात सूर्याला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं त्याचं रँकिंगमध्ये 10 गुणांचं नुकसान झालं.पण तरीही सूर्यकुमार यादव आपलं स्थान अव्वल ठेवलं आहे.
ट्वीट-
Top #T20WorldCup performers biggest gainers in the latest @MRFWorldwide ICC Men’s T20I Player Rankings.
— ICC (@ICC) November 16, 2022
Details 👇https://t.co/MKEWVUpZCs
मोहम्मद रिझवान, बाबरचं कितव्या क्रमांकावर?
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांची बॅट शांत दिसली. ज्यामुळं त्यांना आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करता आली नाही. मोहम्मद रिझवान 836 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, बाबर आझम तिसऱ्या क्रमाकांवर आहे. बाबरचे 778 इतके गुण आहेत. बाबरला टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावण्याचा फायदा मिळाला.
टी-20 विश्वचषकात सूर्याची चमकदार कामगिरी
टी-20 विश्वचषकात सूर्या कुमार यादवनं तुफान फॉर्ममध्ये दिसला. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सहा डावात सूर्यकुमार यादवनं 75 च्या सरासरीनं 235 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 193.96 इतका होता. या स्पर्धेत सूर्याच्या बॅटमधून तीन अर्धशतकं झळकली. तर, 68 त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
न्यूझीलंड दौऱ्यात सूर्यकुमारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
सूर्या सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षी त्यानं टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. सूर्यानं 2022 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 44.60 च्या सरासरीनं आणि 186.54 च्या स्ट्राइक रेटनं 29 डावात 1 हजार 36 धावा केल्या आहेत. सध्या सूर्यकुमार यादव टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. टी-20 मालिकेपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. तसेच पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या मालिकेत सूर्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी अपेक्षा केली जातेय.
हे देखील वाचा-