NZ vs IND: 'आम्हाला काही सिद्ध करण्याची गरज नाही' हार्दिक पांड्याचं मायकेल वॉनला प्रत्युत्तर
Hardik Pandya On Michael Vaughan: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता.
Hardik Pandya On Michael Vaughan: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासह भारताचे फायनल गाठण्याचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले. यादरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननं (Michael Vaughan) भारताच्या कामगिरीवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यानं भारताला इतिहासातील सर्वात अंडर परफॉर्मिंग टीम म्हटलंय. दरम्यान, मायकल वॉनच्या वक्तव्यावर भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक (Hardik pandya) पांड्यांनं प्रत्युत्तर दिलंय.
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला पत्रकार परिषदेत मायकेल वॉनच्या कमेंटबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी हार्दिक पांड्या म्हणाला की, "जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करू शकत नाही, तेव्हा लोक त्यांचं मत देतात. याचाही आम्ही आदर करतो. मला समजतं की लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. जरी मला वाटतं की आम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तो एक खेळ आहे. येथे आपण नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु परिणाम काहीही ठरू शकतो. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यावर आपल्याला काम करणं आवश्यक आहे."
मायकल वॉन काय म्हटलंय?
द टेलिग्राफच्या एका अर्टिकलमध्ये मायकल वॉननं लिहलं होतं की, "2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियानं पुढं काय केलंय? काहीच नाही. भारतीय टीम इतिहास की सर्वात अंडर परफॉर्मिंग टीम आहे. जगभरातील कोणताही खेळाडू आयपीएल खेळल्यानंतर त्याच्या खेळात सुधारणा झाल्याचं बोलतो. पण भारतीय संघानं काय मिळवलं? भारतीय संघात खूप टॅलेंट आहे, पण त्यांचा खेळ पाहून मी थक्क झालोय. त्यांच्याकडं खेळाडू आहेत पण, त्यांच्याकडं खेळ खेळण्याची योग्य पद्धत नाही. त्यांना त्यांची प्रक्रिया बरोबर करावी लागेल. पहिल्या 5 षटकांमध्ये ते विरोधी संघातील गोलंदाजांना विश्रांतीची संधी का देतात?" असं वॉन यांनी म्हटलंय
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेच वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च |
हे देखील वाचा-