ICC T-20 World Cup 2024: आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा 2 जूनपासून सुरु होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.


टी-20 विश्वचषकासाठी (ICC T-20 World Cup 2024) भारतीय सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे इतर देशांनी देखील 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेत उतरणार आहे. भारतीय संघ विश्वचषक मोहिमेची सुरुवात आयर्लंडविरुद्ध करणार आहे. भारत आणि आयर्लंडचा सामना 5 जून रोजी होणार आहे. यानंतर टीम इंडिया 9 जून रोजी दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.


जेतेपद पटकावणार संघ होणार मालामाल-


टी-20 विश्वचषक पटकावणारा संघ मालामाल होणार आहे. टी-20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम 5.6 दशलक्ष डॉलर्स आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहिली तर ती अंदाजे 46.77 कोटी रुपये येते. त्याचबरोबर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 13.36 कोटी रुपये आहे. तर उपविजेत्याला 6.68 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे.


सुपर-12 स्टेजमधून बाहेर पडलेल्या संघांना किती पैसे मिळतील?


टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 3.32 कोटी रुपये मिळतील. तर सुपर-12 टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांमध्ये 5.85 कोटी रुपये वितरित केले जातील. म्हणजेच ही रक्कम सर्व संघांमध्ये विभागली जाईल. 2 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिजशिवाय अमेरिकेच्या मैदानावरही स्पर्धेचे सामने खेळवले जातील. 


टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ: (India Squad For ICC T-20 World Cup 2024)


रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 


राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद 


भारतीय संघाचे वेळापत्रक


5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 


संबंधित बातम्या:


मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल


सर्व काही आपल्या मनाप्रमाणे...; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत रोहित शर्मा काय बोलून गेला?


पत्रकार परिषद संपताच मैदानात गेला; रोहित शर्मा रिंकू सिंहला भेटला, काहीतरी बोलला अन्..., Photo's