ICC T-20 World Cup Rohit Sharma: पत्रकार परिषद संपताच मैदानात गेला; रोहित शर्मा रिंकू सिंहला भेटला, काहीतरी बोलला अन्..., Photo's
रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ अमेरिका व वेस्ट इंडिज इथे होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत आणि त्यांच्यासोबत 4 राखीव खेळाडू जाणार आहेत. (photo credit- bcci)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंघ जाहीर झाल्यानंतर निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी काल (गुरुवारी) मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. (photo credit-BCCI)
रिंकू सिंहला राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे विविध दिग्गज खेळाडूंनी नाराजी दर्शवली होती. यावर देखील रोहित शर्माने स्पष्टीकरण दिले. (Photo credit- Mumbai Indians)
तसेच पत्रकार परिषद झाल्यानंतर रोहित शर्माने रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, गौतम गंभीरची भेट घेतल्याचे दिसून आले. (Photo credit- Mumbai Indians)
रिंकू सिंहला रोहित शर्मा काहीतरी सांगताना दिसला. (image credit-kkr)
रोहित शर्मा केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरसोबतही बोलताना दिसला. श्रेयस अय्यरला देखील टी-20 विश्वचषकाच्या संघातून डच्चू देण्यात आलं आहे.
भारताच्या संघात चार फिरकीपटू आहेत आणि तीन जलदगती गोलंदाजांसह दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. 1 जूनपासून ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. (image credit-bcci))
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद (Image Credit-BCCI)