रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ अमेरिका व वेस्ट इंडिज इथे होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत आणि त्यांच्यासोबत 4 राखीव खेळाडू जाणार आहेत. 


संघ जाहीर झाल्यानंतर निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी काल (गुरुवारी) मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. रोहितला यावेळी मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरुन हटवल्यावरुनही प्रश्न विचारण्यात आला. यावर देखील रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली.


रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला?


रोहित शर्माला हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळण्याचा अनुभव विचारण्यात आला. यावर रोहित शर्मा म्हणाला, 'बघा, हा जीवनाचा एक भाग आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. हा एक चांगला अनुभव होता.' रोहित म्हणाला, 'यापूर्वीही मी अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. हे माझ्यासाठी वेगळे किंवा नवीन नाही, असं रोहित शर्माने सांगितले. दरम्यान, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली व्यतिरिक्त, रोहित फ्रँचायझी क्रिकेटमध्ये ॲडम गिलख्रिस्ट, हरभजन सिंग आणि रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली भारताकडून खेळला आहे. 


हार्दिक पांड्याची निवड का ?


हार्दिक पांड्यामुळे संघ संतुलित होतो, कर्णधाराला जास्त पर्याय मिळतात, दुसरा खेळाडू निवडणं कठीण असे अजित आगरकरने सांगितलं. अजित आगरकर म्हणाला की, उपकर्णधारपदाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. हार्दिक पांड्याने क्रिकेटपटू म्हणून काय केले, हे सर्वांना माहितेय. खेळाडू म्हणून त्याला बदलणे कठीण आहे. हार्दिक पांड्यामुळे कर्णधारालाही बरेच पर्याय उपलब्ध होत आहे. तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घ विश्रांतीनंतर परत येत आहे. 


टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-


रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद 


संबंधित बातम्या:


 पत्रकार परिषद संपताच मैदानात गेला; रोहित शर्मा रिंकू सिंहला भेटला, काहीतरी बोलला अन्..., Photo's


Rinku Singh: ती एक चूक महागात पडली; रिंकू सिंहला भारतीय संघात स्थान न मिळण्यास कोलकाता नाइट रायडर्स जबाबदार?


विश्वचषकासाठी बुमराहला उपकर्णधार बनवा; इरफान पांड्याच्या हात धुवून मागे लागला, आता काय म्हणाला?