IPL 2024 KKR vs MI: कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सचा (MI) 24 धावांनी पराभव केला आहे. यासह यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आले. कोलकाताला 19.5 षटकांत 169 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर मुंबईचा डाव 18.5 षटकांत 145 धावांत संपुष्टात आला. 


मुंबई आणि कोलकाताचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर झाला. यावेळी संपूर्ण मैदानात प्रेक्षकांनी भरलं होतं. मुंबईला पाठिंबा देण्यासाठी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील मैदानात उपस्थित होती. तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सारा तेंडुलकरचा लूक प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरचीच जास्त चर्चा असल्याचं दिसून येत आहे.


सारा तेंडुलकर अनेकवेळा मुंबईला पाठिंबा देण्यासाठी सामन्याला उपस्थिती लावत असते. सारा तेंडुलकरचा भाऊ अर्जुन तेंडुलकरही मुंबईच्या संघात आहे. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये अद्याप संधी मिळालेली नाही.  आयपीएलच्या गेल्या हंगामात अर्जुन तेंडुलकरने मुंबईकडून पदार्पण केले होते. 






मुंबई इंडियन्चा पराभव-


केकेआरने पहिल्या खेळात 169 धावा केल्या होत्या, ज्यासाठी व्यंकटेश अय्यरने 70 धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरली तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाने 46 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा 11 धावा, इशान किशन 13 आणि नमन धीर 11 धावाच करू शकला. सूर्यकुमार यादव खंबीरपणे उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 56 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकारही लगावले. 


कोलकाताची भेदक गोलंदाजी-


विशेषत: फिरकीपटूंनी कोलकाता नाईट रायडर्ससाठी शानदार गोलंदाजी केली. सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी 4 षटके टाकली आणि दोघांनी 22 धावांत 2-2 विकेट घेतल्या. त्याने मधल्या षटकांमध्ये मुंबईच्या फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करण्यापासून रोखले. मिचेल स्टार्कने शेवटच्या षटाकांत वर्चस्व गाजवत 4 विकेट्स घेतल्या. वास्तविक, सामन्याचा गेम चेंजर आंद्रे रसेल होता, ज्याने सूर्यकुमार यादवची विकेट घेत सामना केकेआरकडे वळवला, त्याशिवाय त्याने हार्दिक पांड्याची विकेटही घेतली.


संबंधित बातम्या:


9 संघ जाहीर, 11 अजूनही बाकी...टी-20 विश्वचषकासाठी कोणता संघ भारी?, पाहा सर्व माहिती एका क्लिकवर


सर्व काही आपल्या मनाप्रमाणे...; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत रोहित शर्मा काय बोलून गेला?


पत्रकार परिषद संपताच मैदानात गेला; रोहित शर्मा रिंकू सिंहला भेटला, काहीतरी बोलला अन्..., Photo's