(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC ODI Rankings : बाबर पहिला क्रमांक सोडेना, विराट दुसऱ्या स्थानी, रोहित कितव्या क्रमांकावर?
ICC ODI Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत बुमराह सातव्या क्रमांकावर आहे.
ICC ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने नुकतीच एकदिवसीय खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंची क्रमवारी आयसीसीकडून जारी करण्यात आली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आजम पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीचं दुसरं स्थान कायम आहे. गोलंदाजीमध्ये बुमराहा सातव्या क्रमांकावर आहे. तर अष्टपैलू खेळाडूमध्ये रविंद्र जाडेजा नवव्या क्रमांकावर आहे. फलंदाजीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा अव्वल दहा खेळाडूमध्ये कायम आहेत. विराट कोहली दुसऱ्या तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारतीय संघातील फक्त चार खेळाडूंना आपलं स्थान पटकावता आले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजा यांचा अपवाद वगळता एकही भारतीय खेळाडूंना अव्वल दहामध्ये स्थान पटकावता आलेलं नाही.
नुकत्याच झालेल्या मायदेशातील मालिकेत दमदार कामगिरी कऱणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आयसीसीच्या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. क्विंटन डी कॉकने पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान पटकावलेय तर रूसी व्हॅन डर डुसेन यांने अव्वल दहामध्ये प्रवेश केला आहे.
🔹 Quinton de Kock continues his rise 🔼
— ICC (@ICC) January 26, 2022
🔹 Massive gains for Rassie van der Dussen 🔥
🔹 England players move up in the T20I charts 📈
Here’s how things stand after the latest update to the @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings 📝
Details 👉 https://t.co/Jxktm5FBsr pic.twitter.com/HBGUPKNHsT
रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकले होते. या दोघांच्या आयसीसी क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिखर धवनला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. धवनने तीन सामन्यात 169 धावा चोपल्या होत्या. याचा फायदा धवनला झाला असून आयसीसी क्रमवारीत 15 व्या स्थानावर पोहचला आहे. तर तडकाफडकी फलंदाजी करणारा पंत 82 व्या क्रमांकार पोहचलाय.
टॉप पाच फलंदाज -
बाबर आझम
विराट कोहली
रॉस टेलर
रोहित शर्मा
क्विंटन डी कॉक
टॉप पाच गोलंदाज -
ट्रेंट बोल्ट
जोश हेजलवुड
ख्रिस वोक्स
मुजीब उर रहमान
मेहंदी हसन