World Cup 2023 : मोठ्या स्पर्धेत बाबरची बॅट शांतच, नंबर 1 फलंदाजाची लाजीरवाणी आकडेवारी
World Cup 2023 : आतापर्यंत मोठ्या स्पर्धेत बाबर आझमची बॅट शांतच राहिली आहे. आकडे बाबर आझमच्या लाजीरवाण्या कामगिरीला साक्ष आहेत.
ICC Cricket World Cup 2023 : बाबर आझम याची बॅट विश्वचषकात शांत आहे, त्याचा फटका पाकिस्तानला संघाला बसला आहे. पाकिस्तान संघाला चार सामन्यात दोन पराभवाचा सामना करावा लागला आहे. अद्याप बाबर आझम याला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या बाबरकडून पाकिस्तानच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. आतापर्यंत मोठ्या स्पर्धेत बाबर आझमची बॅट शांतच राहिली आहे. आकडे बाबर आझमच्या या कामगिरीला साक्ष आहेत.
बाबर आझमची बॅट आयसीसी स्पर्धा अथवा मल्टी नॅशनल स्पर्धेत चालत नाही, हे आकडेवारीवरुन दिसतेय. बाबर आझम याने छोट्या संघाविरोधात मोठी धावसंख्या उभारली आहे. मात्र विश्वचषकासारख्या आयसीसी स्पर्धेतील बहुतांश सामन्यांमध्ये बाबर आझमची बॅट शांतच राहते. आशिया कप 2022, T20 विश्वचषक 2022, आशिया कप 2023 आणि सध्याचा एकदिवसीय विश्वचषक 2023 या स्पर्धेत बाबरची बॅट शांतच राहिली आहे. मागील चार मल्टी नॅशनल स्पर्धेतील आकडेवारी पाहिल्यास बाबरची बॅट शांतच असल्याचे दिसतेय. बाबर आझमने या चार स्पर्धेत एकूण 21 डाव खेळले असून त्यात त्याने फक्त दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावता आले आहे. पाहा आकडेवारी..
आशिया कप 2022
10 विरुद्ध भारत
9 विरुद्ध हॉन्गकॉन्ग
14 विरुद्ध भारत
0 विरुद्ध अफगानिस्तान
30 विरुद्ध श्रीलंका
5 विरुद्ध श्रीलंका
टी20 वर्ल्ड कप 2022
0 विरुद्ध भारत
4 विरुद्ध झिम्बॉब्वे
4 विरुद्ध नेदरलँड
6 विरुद्ध दक्षिण आफ्रिका
25 विरुद्ध बांगलादेश
53 विरुद्ध न्यूझीलंड (0 कॅच सुटला)
32 विरुद्ध इंग्लंड
आशिया कप 2023
151 विरुद्ध नेपाल (40 पर कैच छूठा था)
17 विरुद्ध बांगलादेश
10 विरुद्ध भारत
29 विरुद्ध श्रीलंका
वर्ल्ड कप 2023
5 (18 चेंडूमध्ये) विरुद्ध नेदरलँड
10 (15 चेंडूमध्ये) विरुद्ध श्रीलंका
50 (58 चेंडूमध्ये) विरुद्ध भारत
18 (14 चेंडूमध्ये) विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वरील बाबर आझमचे हे आकडे पाहिल्यानंतर मोठ्या स्पर्धे बॅट शांत राहत असल्याचे दिसतेय. 21 डावांमध्ये बाबरने नेपाळविरुद्ध केवळ एक शतक झळकावले होते, परंतु त्या सामन्यातही त्याचा 40 धावांवर एक झेल सुटला होता. आता विश्वचषकात पाकिस्तान संघाला आपले आव्हान जिवंत ठेवायचे असल्यास बाबर आझम याला मोठी खेळी करावी लागणार आहे. दरम्यान, पाकिस्तान संघ सध्या सरासरी कामगिरी करत आहे. गोलंदाजीमध्ये शाहीन आफ्रिदी फॉर्मात परतलाय. पण इतर गोलंदाजाकडून हवी तशी मदत मिळत नाही. फिरकी बाजू अतिशय कमकुवत असल्याचे दिसतेय. त्याशिवाय कर्णधार बाबर आझमही फॉर्मात नाही. लोअर मिडल ऑर्डरही फ्लॉप जातोय. पाकिस्तान संघाला पाच सामन्यात विजय मिळवायचा असेल तर खेळ उंचावावा लागणार आहे.