Champions Trophy 2025 : तारीख ठरली! चॅम्पियन्स ट्रॉफी येणार भारतात, ICCने केली घोषणा
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी चाहते आधीच खूप उत्सुक आहेत. ही स्पर्धा 8 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे.
ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी चाहते आधीच खूप उत्सुक आहेत. ही स्पर्धा 8 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे, मात्र या स्पर्धेचे आयोजन कोण करणार यावर अद्यापही सस्पेंस कायम आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे, यात शंका नाही. परंतु बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन कोण करणार आणि ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाईल की नाही याबद्दल अनेक अहवाल समोर येत आहेत. दरम्यान, आसीसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2013 मध्ये जिंकलेली ट्रॉफी लवकरच भारतात येणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी येणार भारतात?
चॅम्पियन्स ट्रॉफी जानेवारी महिन्यात भारतात येणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले आहे. भारतीय चाहत्यांना 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहता येणार आहे. आयसीसीने केलेल्या घोषणेचा होस्टिंगशी काहीही संबंध नाही. येथे आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी दौऱ्याबद्दल बोलत आहोत, जी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली जाईल.
The ICC Champions Trophy 2025 trophy tour in Pakistan gets underway in Islamabad with 2017 winner @76Shadabkhan 🏆🤩🇵🇰 pic.twitter.com/r8vE0rpNCz
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 16, 2024
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयार केलेल्या टूर प्लॅननुसार ट्रॉफी 16 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये होणार आहे. त्यानंतर ते अफगाणिस्तानला पाठवले जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचे संपूर्ण वेळापत्रक येथे पहा -
- 16 नोव्हेंबर - इस्लामाबाद, पाकिस्तान
- 17 नोव्हेंबर – तक्षशिला आणि खानपूर, पाकिस्तान
- 18 नोव्हेंबर - अबोटाबाद, पाकिस्तान
- 19 नोव्हेंबर - मुरी, पाकिस्तान
- 20 नोव्हेंबर - नाथिया गली, पाकिस्तान
- 22-25 नोव्हेंबर - कराची, पाकिस्तान
- 26-28 नोव्हेंबर - अफगाणिस्तान
- 10-13 डिसेंबर - बांगलादेश
- 15-22 डिसेंबर - दक्षिण आफ्रिका
- 25 डिसेंबर-5 जानेवारी - ऑस्ट्रेलिया
- 6-11 जानेवारी - न्यूझीलंड
- 12-14 जानेवारी - इंग्लंड
- 15-26 जानेवारी - भारत
आयसीसीने बनवलेल्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 15 ते 26 जानेवारी दरम्यान भारतात असणार आहे. यानंतर ही ट्रॉफी पुन्हा पाकिस्तानला पाठवली जाईल जिथे मेगा इव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे.
हे ही वाचा -
एक फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन, सचिनच्या पोस्टने खळबळ; 11 वर्षांपूर्वीचा 'ती' जखम ताजी; रोख कुणाकडे?