एक फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन, सचिनच्या पोस्टने खळबळ; 11 वर्षांपूर्वीचा 'ती' जखम ताजी; रोख कुणाकडे?
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जिथे, बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करण्याच्या उद्देशाने टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे.
Sachin Tendulkar vs umpire Steve Bucknor : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जिथे, बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करण्याच्या उद्देशाने टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे. याआधी टीम इंडियाने अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती. दरम्यान, महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या एका सोशल मीडिया पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सचिनने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो तीन मोठ्या झाडांसमोर फलंदाजी करताना दिसत आहे. आणि तिन्ही झाडे विकेट्ससारखी दिसत आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये सचिनने त्याच्या चाहत्यांना विचारले की कोणत्या अंपायरमुळे स्टंप इतका मोठा वाटला?
Can you guess which umpire made the stumps feel this big? 🤔 pic.twitter.com/oa1iPvVza1
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 16, 2024
या प्रश्नाच्या उत्तरात चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक उत्तरे दिली आहेत. अनेकांनी सांगितले की ही पोस्ट माजी पंच स्टीव्ह बकनर यांच्यासाठी केली. 1990 आणि 2000 च्या दशकात पंच स्टीव्ह बकनरचे सचिन तेंडुलकरसोबत चांगले संबंध नव्हते. सचिनची पोस्ट म्हणजे बकनरने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांचा स्पष्ट संदर्भ आहे, असे चाहत्यांचे मत आहे. 2008 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान, बकनरच्या काही निर्णयांवर जोरदार टीका झाली होती. अशा परिस्थितीत सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सचिनच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
11 वर्षांपूर्वीचा 'ती' जखम ताजी...
2003 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा, ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. जेसन गिलेस्पीच्या गोलंदाजीवर तेंडुलकरला लेग बिफोर विकेट (LBW) देण्यात आली. पण टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की चेंडू स्टंपवरून गेला असेल. चेंडू उंच असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आणि सचिनला बाद घोषित करण्याच्या बकनरच्या निर्णयाने वादाला तोंड फुटले होते. सचिन तेव्हा महत्त्वाची खेळी खेळत होता आणि या निर्णयाने भारताला अडचणीत आणले होते. त्यावर चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली होती. सचिन तेंडुलकरची ही पोस्ट व्हायरल झाली. यावर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणनेही या पोस्टवर कमेंट केली आहे.
Who else but .... pic.twitter.com/GiowNvwQu4
— ηᎥ†Ꭵղ (@nkk_123) November 16, 2024
हे ही वाचा -