(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WTC Final 2025 Scenarios : एका सामन्याने बदलले WTC फायनलचे गणित! ऑस्ट्रेलिया रेसमधून बाहेर... टीम इंडियाचे काय आहे समीकरण?
How can India qualify for WTC Final : भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून या महत्त्वाच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
WTC Final Scenarios for India After Perth Test Match Win : भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून या महत्त्वाच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी भारतीय संघाला या मालिकेत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. सर्वांच्या अपेक्षेविरुद्ध भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. सर्व खेळाडूंच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे भारताने या सामन्यात दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाचे काय आहे समीकरण?
या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाचे मनोबलही खूप उंचावले आहे, जिथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताने शानदार पुनरागमन केले आणि पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळल्यानंतर हा सामना जिंकला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित 4 कसोटी सामन्यांमध्ये 4 सामने जिंकावे लागतील किंवा भारतीय संघाने 3 सामने जिंकले आणि 1 सामना अनिर्णित राहिला तर भारतीय संघ अजूनही फायनलसाठी पात्र ठरेल.
India round up their biggest Test win by margin of runs in Australia after an all-round show in Perth 🏏#WTC25 #AUSvIND https://t.co/Cg4dCEZTeb
— ICC (@ICC) November 25, 2024
याशिवाय भारताला स्वतःच्या सामन्यांशिवाय श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यांवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. भारतीय संघ कोणताही सामना हरल्यास अंतिम फेरीतील त्यांचे स्थान इतर संघांच्या कामगिरीवर आणि उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल. या कारणास्तव भारतीय संघ आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि या मालिकेत 4-0 किंवा 5-0 ने विजय मिळवेल.
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का!
कांगारू संघ आता डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसला आहे. सध्याच्या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने 8 विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाला 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच 1 सामना अनिर्णित राहिला. पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 90 गुण आणि 57.690 पॉइंट टक्केवारी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अजून 4 कसोटी सामने खेळायचे आहेत.
India leapfrog Australia to reclaim the #WTC25 Standings summit following a massive win in the Border-Gavaskar series opener 📈#AUSvIND | ➡ https://t.co/6O3r9MB6ry pic.twitter.com/g9YNnYGt6y
— ICC (@ICC) November 25, 2024
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रेसमधून ऑस्ट्रेलिया बाहेर?
ऑस्ट्रेलिया अजून बाहेर गेला नाही. त्यांना उर्वरित सात सामन्यांतून किमान चार विजय आवश्यक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे, ज्यांचे चार सामने बाकी आहेत आणि त्यांना WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यापैकी तीन जिंकणे आवश्यक आहे.
भारताने पर्थ कसोटी सामना 295 धावांनी जिंकला
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांना केवळ 150 धावा करता आल्या होत्या. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला 104 धावांवर ऑलआउट केले. दुसऱ्या डावात भारताने 487 धावा करत मोठी आघाडी घेतली आणि त्यांना 238 धावांवर रोखल्यानंतर 295 धावांनी सामना जिंकला.