(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टी20 विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेट कुणाचा? एकही भारतीय नाही, पाहा टॉप 5 खेळाडूंची यादी
Highest run-scorers at T20 World Cup : टी20 विश्वचषकाचं नववं पर्व 2 जूनपासून सुरु होणार आहे. पहिल्यांदाच विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत, त्याशिवाय यंदाचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे.
Highest run-scorers at T20 World Cup : टी20 विश्वचषकाचं नववं पर्व 2 जूनपासून सुरु होणार आहे. पहिल्यांदाच विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत, त्याशिवाय यंदाचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. 20 संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले. विश्वचषकामध्ये आता अनेक रेकॉर्ड मोडले जातील, अन् नवे विक्रमही होती. टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर आहेत ? सर्वाधिक स्ट्राईक रेट कुणाचा आहे... याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत..
टी20 विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेट असणारे टॉप 5 फलंदाज
1 . जोस बटलर ( 144.48 ) :
जगातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाजामध्ये जोस बटलर याचं नाव घेतले जाते. सलामीला सर्वात वेगानं धावा काढण्यात तो माहीर आहे. विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेट बटलरच्याच नावावर आहे. जोस बटलर यानं 144.48 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची पिटाई केली आहे. यंदाच्या विश्वचषकातही फटकेबाजी करण्यासाठी जोस बटलर तयार आहे.
2 . एबी डिविलियर्स (142.75 ) :
दक्षिण आफ्रिकेचा माजी आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलिअर्स याचाही स्ट्राईक रेट शानदार आहे. विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या फलंदाजात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. एबीने 142.75 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आहे. टी20 विश्वचषकातील 29 डावात त्याने 717 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 षटकार आणि 51 चौकारांचा समावेश आहे.
3 . ख्रिस गेल (142 .75 ) :
युनिवर्स बॉस ख्रिस गेल आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. गेल याला गोलंदाजी करणं गोलंदाजांसाठी कठीण जातं. तो कोणत्याही चेंडूवर मोठा फटका मारु शकतो. विश्वचषकात दोन शतकं ठोकणारा गेल एकमेव फलंदाज आहे. गेल यानं विश्वचषकात 142.75 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.
4 . महेला जयवर्धने (134.74 ) :
श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धने यानं टी 20 विश्वचषकात 39.07 च्या सरासरीने धावा चोपल्या आहे. त्यानं 134.74 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आहे. सर्वाधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्यात तो चौथ्या क्रमांकावर आहे.
5 . डेविड वॉर्नर ( 133.22 ) :
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर सर्वाधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 133.22 च्या स्ट्राईक रेटने विश्वचषकात फलंदाजी केली आहे. विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या टॉप 5 फलंदाजामध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.
विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज -
विराट कोहली ( 1141 धावा ) :
टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने 27 सामन्यातील 25 डावात फलंदाजी केली. विराट कोहलीने 131 च्या स्ट्राईक रेटने 25 डावात 1141 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणजे, प्रत्योक दुसऱ्या डावाला विराट कोहलीच्या बॅटमधून अर्धशतक येते. टी20 विश्वचषकात विराट कोहलीच्या नावावर 28 षटकार आणि 103 चौकारांची नोंद आहे. टी20 मध्ये विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 89 इतकी आहे.
महेला जयवर्धने (1016 धावा ) :
महेला जयवर्धने अखेरचा टी20 विश्वचषकात 2014 मध्ये खेळला.जयवर्धने यानं 2007 ते 2014 यादरम्यान 31 सामने खेळले, त्यामध्ये त्याने 1016 धावा काढल्या. त्याने एक शतक आणि सहा अर्धशतके ठोकली आहेत. टी20 विश्वचषकात सर्वाधिक चौकारांचा विक्रम जयवर्धने याच्याच नावावर आहे. त्याने 111 चौकार ठोकले आहेत.
ख्रिस गेल (965 धावा ):
युनिवर्स बॉस ख्रिस गेल टी2 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने 31 डावात 965 धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके आणि 7 अर्धशतके ठोकली आहेत. टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम गेलच्या नावावर आहे, त्याने 63 षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्मा ( 963 धावा ) :
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी 20 विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. रोहित शर्माने 39 सामने खेळले आहे. त्यामधील 36 जावात त्याने 963 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 79 इतकी आहे. रोहित शर्माने 128 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने 91 चौकार आणि 35 षटकार ठोकलेत.
तिलकरत्ने दिलशान ( 897 धावा ) :
2007 ते 2016 यादरम्यान तिलकरत्ने दिलशान याने टी20 वर्ल्ड कपमध्ये 35 सामने खेळलेत. यातील 34 डावात त्याने 124.06 च्या स्ट्राइक रेटने 897 धावा केल्या आहेत. त्याने 101 चौकार आणि 20 षटकार ठोकलेत.