IND vs SA Womens World Cup Final : अरे हे काय करतेय... जिंकल्यानंतर हरमनप्रीत ट्रॉफी घ्यायला गेली; पण जय शाहांनी अचानक रोखलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?, VIDEO
India Won Women's World Cup 2025 : सध्या संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. कारण भारताच्या महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला आहे.

IND vs SA Womens World Cup Final 2025 : सध्या संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. कारण भारताच्या महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप (India Won Women's World Cup 2025) जिंकला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत (India beat South Africa Womens World Cup Final 2025) करत महिला वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. खचाखच भरलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये भारताने इतिहास रचला. या ट्रॉफीची भारताला अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. मात्र, जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौर ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेल्या, तेव्हा घडलेली एक घटना सर्वांच्याच लक्ष्य वेधले.
जिंकल्यानंतर हरमनप्रीत ट्रॉफी घ्यायला गेली अन्...
आयसीसीचे चेअरमन जय शाह ट्रॉफी घेऊन स्टेजवर उभे होते. हरमनप्रीत कौर नाचत स्टेजवर आल्या, तिने जय शाह यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर जय शाहांच्या पाया पडण्यासाठी पुढे आली, पण जय शाह यांनी अचानक हरमनप्रीत कौरला रोखलं. त्यांनी तसं करू दिलं नाही. उलट त्यांनी स्वतःच पुढे झुकून हरमनप्रीत कौर यांचा सन्मान केला. त्यामुळे जय शाह यांनी फक्त हरमनप्रीतचाच नाही, तर संपूर्ण भारतीय महिला संघाचा आणि देशातील मुलींचा मान वाढवला. ट्रॉफी देऊन ते तत्काळ स्टेजवरून उतरले, आणि त्यानंतर भारतीय संघाने आनंदात विजयाचा जल्लोष साजरा केला. ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Just see the SANSKAR
— PallaviCT (@pallavict) November 2, 2025
Harmanpreet tried to TOUCH feet of Jay Shah but he REFUSED & in fact, BOWED to her as she’s Nari Shakti of Bharat 🇮🇳
Then he gave the trophy & LEFT the stage ASAP after the mandatory photos
Recall a leader who was pushed off the stage by the RUDE Aussies… pic.twitter.com/wjLpT6nS9R
बीसीसीआयची मोठी घोषणा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने महिला वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघासाठी तब्बल 51 कोटींच्या बक्षीस रकमची घोषणा केली आहे. या घोषणेची माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली. 2000 नंतर प्रथमच महिला वर्ल्ड कपला नवीन विजेता मिळाला आहे.
भारत-दक्षिण अफ्रिकेचा अंतिम सामना कसा राहिला? (IND vs SA Womens World Cup Final 2025)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्मा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज ठरली. तिने 78 चेंडूत 87 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शेफालीने मानधना (45) सोबत 104 धावांची सलामी भागीदारी केली. दीप्ती शर्मानेही 58 चेंडूत 58 धावा केल्या, रिचा घोषने 24 चेंडूत 34 धावा केल्या, जेमिमाह रॉड्रिग्जने 24 आणि हरमनप्रीत कौरने 20 धावा केल्या.
भारताच्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्डने शतक केले. लॉरा वोल्वार्डने 98 चेंडूत 101 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 1 षटकार होता. तर अॅनेरी डिर्कसेनने 35, सन लुसने 25 आणि तंजीम ब्रिट्सने 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून दीप्ती शर्माने सामना फिरवून टाकणारी गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने उजव्या हाताच्या फिरकीपटूने 9.3 षटकांत 39 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. शेफाली वर्माने दोन आणि श्री चरणीने एक विकेट घेतली.
हे ही वाचा -





















