Hardik Pandya : कस्टमच्या ताब्यात असणाऱ्या घड्याळावर हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण, जाणून घ्या काय म्हणाला?
Hardik Pandya News : युएईवरुन परतलेल्या हार्दिक पांड्याकडून कस्टम विभागाने सोमवारी दोन घड्याळं जप्त केली होता. यावर हार्दिक पांड्यानं स्पष्टीकरण दिलेय...
![Hardik Pandya : कस्टमच्या ताब्यात असणाऱ्या घड्याळावर हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण, जाणून घ्या काय म्हणाला? Hardik Pandya wrist watch cost of watch approx 1.5 crore not 5 crore, confirmed to pay custom duty- says hardik pandya Hardik Pandya : कस्टमच्या ताब्यात असणाऱ्या घड्याळावर हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण, जाणून घ्या काय म्हणाला?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/12/84d654c8d69baaebeaa575cbd248b5c8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hardik Pandya Wrist Watch : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं मुंबई कस्टम विभागानं जप्त केलेल्या दोन घड्याळावर स्पष्टीकरण दिलं आहे. सोमवारी युएईतून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्याची दोन घड्याळं मुंबई कस्टम विभागानं जप्त केली होती. या घडाळाची किंमत पाच कोटी असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. यावरुन हार्दिक पांड्या यानं ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. हार्दिक पांड्यानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क कांऊटर मी स्वत: गेलो होतो. तिथे सोबत आणलेल्या सामानाची माहिती आणि सीमाशुल्क भरण्यासाठी गेलो होतो. कस्टम विभागानं ताब्यात घेतलेल्या दोन घड्याळांची किंमत सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये पाच कोटी असल्याचं सांगितलं जातेय. मात्र, या घड्याळाची किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे.
सोमवारी हार्दिक पांड्या यूएईमधून मुंबईत परतला. विमानतळावर पोहचल्यानंतर कस्टमनं हार्दिक पांड्याची 5 कोटी रुपयांच्या किंमतीची 2 घड्याळं ताब्यात घेतली आहे. हार्दिक पांड्याकडे या घड्याळाचे इनवॉइस नव्हते. तसंच त्यानं या घड्याळांची कोणताही माहिती दिली नसल्याचं मुंबई कस्टम विभागानं सांगितलं. यूएईमध्ये झालेल्य विश्वचषकात भारतीय संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत भारतीय संघ साखळी स्पर्धेतून बाहेर पडला. सोमवारी भारतीय संघ मायदेशी परतला, त्यावेळी कस्टमला हार्दिक पाड्याकडं तब्बल 5 कोटी रुपये किंमतीची 2 घड्याळं आढळली. परंतु, हार्दिककडं या घड्याळ्यांची पावती नाही. तसेच त्यानं या घड्याळ्यांचा कस्टम वस्तूंमध्ये समावेशही केला नाही. ज्यामुळं कस्टमनं ही दोन्ही घड्याळं ताब्यात घेतली आहे.
— hardik pandya (@hardikpandya7) November 16, 2021
दरम्यान, हार्दिक पांड्या मायदेशात परत असताना त्याच्याकडं महागडी घड्याळ सापडल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. टी-20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याकडं ही घड्याळं कशी आली? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर, हार्दिक पांड्याला आतापर्यंत अटक का नाही झाली? असंही एका नेटकऱ्यानं म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)