एक्स्प्लोर

Team India Captain : गेल्या 16 डावात फक्त 166 धावा... रोहित शर्माची होणार उचलबांगडी? टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार; रेसमध्ये दोन पठ्ठ्यांची एन्ट्री

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चांगली सुरुवात केली.

Hardik Pandya Replace Rohit Sharma Team India Captain : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चांगली सुरुवात केली. दोन्ही संघांमधील पहिला सामना गुरुवारी (6 फेब्रुवारी) नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला. भारतीय संघाने हा सामना फक्त 38.4 षटकांत 4 गडी राखून जिंकला. भारतीय संघाने हा सामना निश्चितच जिंकला आहे, परंतु संघ व्यवस्थापनासाठी अजूनही टेन्शन वाढले आहे. कर्णधार रोहितचा सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. हिटमॅन सतत फ्लॉप होताना दिसत आहे. 

नागपूर एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहितने 7 चेंडू खेळले पण त्याला फक्त 2 धावा करता आल्या. वेगवान गोलंदाज साकिब महमूदने रोहितला त्याच्या इनस्विंगर चेंडूच्या जाळ्यात अडकवले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी देखील त्याच फॉरमॅटमध्ये खेळायची आहे. अशा परिस्थितीत, रोहितचा खराब फॉर्म हा चिंतेचा एक प्रमुख कारण आहे.

हार्दिक पांड्या होणार टीम इंडियाचा कर्णधार?

आता एका नवीन अहवालात असे समोर आले आहे की, जर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर रोहितकडून कर्णधारपद काढून घेऊन हार्दिक पांड्याकडे सोपवले जाऊ शकते. अहवालात म्हटले आहे की मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना हार्दिक पांड्या उपकर्णधार बनवायचे होते, परंतु रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांना शुभमन गिलला उपकर्णधार बनवायचे होते. दरम्यान, सूर्यकुमार यादवचा फॉर्म पाहता, टी-20 संघाची कमान हार्दिककडे सोपवण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले.

हार्दिक पांड्यासोबत झाला अन्याय...

बीसीसीआयमधील अनेक लोक आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा असा विश्वास आहे की, हार्दिकवर अन्याय झाला आहे. तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे त्याने कर्णधारपद गमावले, परंतु त्याचा वैयक्तिक फॉर्म उत्कृष्ट राहिला आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 डावांमध्ये तो फक्त 28 धावा करू शकला. अशा परिस्थितीत सूर्याकडून कर्णधारपद काढून हार्दिककडे सोपवले जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.  

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी गेल्या 16 डावात फक्त 166 धावा...

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, गेल्या 10 डावांमध्ये रोहित शर्माला एकदाही 20 धावांचा आकडा गाठता आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या 16 डावांमध्ये त्याने फक्त 166 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 10.37 आहे. शतक तर सोडाच, या काळात त्याच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक आले आहे. एका डावात त्याने 20 धावांचा टप्पा ओलांडला आहे, तर 11 डावात तो दुहेरी आकडाही ओलांडू शकलेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे. पण, मालिकेत अजूनही दोन सामने शिल्लक आहेत.

हे ही वाचा -

Ind vs Eng 1st ODI : आधी तिलक... आता शुभमन गिलचा 'विश्वासघात', हार्दिकच्या 'त्या' षटकारने उपकर्णधारचा केला गेम; 36 व्या षटकात काय घडलं? Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant : ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने...
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने...
Ind vs Eng 2nd ODI : नागपुरात डेब्यू, कटकमध्ये पत्ता कट... विराट कोहलीसाठी कर्णधार रोहित शर्मा जिवलग मित्राला देणार डच्चू?
नागपुरात डेब्यू, कटकमध्ये पत्ता कट... विराट कोहलीसाठी कर्णधार रोहित शर्मा जिवलग मित्राला देणार डच्चू?
The Mehta Boys Review : बापलेकाच्या नात्याची कहाणी, वडिलांसोबत आवर्जुन पाहावा असा 'द मेहता बॉयज'
वडिलांसोबत आवर्जुन पाहावा असा 'द मेहता बॉयज'; बोमन इराणी आणि अविनाश तिवारीच्या जोडीची कमाल
Dhule News : धुळ्यातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी ओमानच्या समुद्रात बेपत्ता, कंपनीकडून कुटुंबियांना उडवाउडवीची उत्तरं, नेमकं प्रकरण काय?
धुळ्यातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी ओमानच्या समुद्रात बेपत्ता, कंपनीकडून कुटुंबियांना उडवाउडवीची उत्तरं, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant On Shiv Sena MP : अनेक लोकं संपर्कात, टप्प्या-टप्याने शिवसेनेत प्रवेश होणार - उदय सामंतABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 07 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 07 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सOperation Tiger : शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांचा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant : ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने...
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप्प्याटप्प्याने...
Ind vs Eng 2nd ODI : नागपुरात डेब्यू, कटकमध्ये पत्ता कट... विराट कोहलीसाठी कर्णधार रोहित शर्मा जिवलग मित्राला देणार डच्चू?
नागपुरात डेब्यू, कटकमध्ये पत्ता कट... विराट कोहलीसाठी कर्णधार रोहित शर्मा जिवलग मित्राला देणार डच्चू?
The Mehta Boys Review : बापलेकाच्या नात्याची कहाणी, वडिलांसोबत आवर्जुन पाहावा असा 'द मेहता बॉयज'
वडिलांसोबत आवर्जुन पाहावा असा 'द मेहता बॉयज'; बोमन इराणी आणि अविनाश तिवारीच्या जोडीची कमाल
Dhule News : धुळ्यातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी ओमानच्या समुद्रात बेपत्ता, कंपनीकडून कुटुंबियांना उडवाउडवीची उत्तरं, नेमकं प्रकरण काय?
धुळ्यातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी ओमानच्या समुद्रात बेपत्ता, कंपनीकडून कुटुंबियांना उडवाउडवीची उत्तरं, नेमकं प्रकरण काय?
Shivsena UBT :  राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंच्या शिवसेनेचं संसदेत नवं कार्यालय सुरु, खासदारांचा फोटो समोर
राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंच्या शिवसेनेचं संसदेत नवं कार्यालय, खासदारांचा फोटो समोर
Ladki Bahin Yojana : जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखानं घटली, आणखी लाभार्थी कमी होणार? नेमकं कारणं काय?
जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखानं घटली, येत्या काळात लाभार्थी कमी होणार?
Arrest Warrant Against Actor Sonu Sood: अभिनेता सोनू सूदवर अटकेची टांगती तलवार; अटक करुन हजर करण्याचे कोर्टाचे आदेश, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता सोनू सूदवर अटकेची टांगती तलवार; अटक करुन हजर करण्याचे कोर्टाचे आदेश, प्रकरण नेमकं काय?
RBI Repo Rate Cut:  रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात कपातीच्या घोषणेकडे लक्ष, मध्यमवर्गाला दिलासा मिळणार?
रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात कपातीच्या घोषणेकडे लक्ष कर्ज स्वस्त होणार?
Embed widget