Hardik Pandya Mahika Sharma: You Are Not Ready For This म्हणत हार्दिक पांड्याने 20 फोटो शेअर करुन टाकले!
Hardik Pandya Mahika Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Hardik Pandya Mahika Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या त्याची कथित गर्लंफ्रेंड माहिका शर्मासोबत वेळ घालवताना दिसून येतोय. हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच आशिया चषक संपल्यानंतर हार्दिक पांड्याने माहिका शर्मासोबतचे फोटोही शेअर केले होते. आता धुरंधर चित्रपटातील गाणं शेअर करत हार्दिक पांड्याने 20 फोटो शेअर केले आहेत.
Ladies And Gentlemen You Are Not Ready For This अशा या गाण्याची सुरुवात आहे. हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासह मुलगा अगस्त्य आणि माहिका शर्माचेही फोटो आहेत.
View this post on Instagram
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविकचा घटस्फोट- ((Hardik Pandya And Natasa Stankovic)
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) यांचा 18 जुलै 2024 रोजी घटस्फोट झाला होता. हार्दिक आणि नताशाला एक मुलगा आहे. या मुलाचे दोघंही मिळून सांभाळ करताय.
कोण आहे माहिका शर्मा? (who is mahieka sharma)
माहिका शर्मा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. माहिका शर्मा इंस्टाग्रामवर फॅशन आणि फिटनेस कंटेंट शेअर करते. माहिकाने तिचे शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केले आणि नंतर अर्थशास्त्र आणि वित्त शिक्षण घेतले. तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, माहिकाने अनेक इंटर्नशिप केल्या, ज्यामुळे तिला मॉडेलिंग आणि अभिनय करायला सुरुवात झाली. माहिकाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात फ्रीलांसर म्हणून केली. ती रॅपर रागाच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये अनेक छोट्या भूमिका केल्या, ज्यात "इनटू द डस्क" भाष्य आणि ओमंग कुमारचा चित्रपट "पीएम नरेंद्र मोदी" (2019) यांचा समावेश आहे. माहिका अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे. माहिकाने तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, रितू कुमार आणि अमित अग्रवाल यांच्यासह अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी वॉक केला आहे. 24 वर्षीय माहिका शर्माला 2024 च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये मॉडेल ऑफ द इयर (न्यू एज) पुरस्कार देखील मिळाला.





















