India Squad for Ireland Tour : आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, 'कुंग-फू' पांड्या कर्णधार
IND vs IRE : सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 सामन्यांची मालिका खेळत असून यानंतर आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.
![India Squad for Ireland Tour : आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, 'कुंग-फू' पांड्या कर्णधार IND vs IRE India Squad released for Ireland Tour Hardik Pandya elected as captain India Squad for Ireland Tour : आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, 'कुंग-फू' पांड्या कर्णधार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2018/02/07113255/Hardik-Pandya-16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hardik Pandya captain : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) लवकरच आयर्लंडच्या दौऱ्यावर (India Squad for Ireland Tour) जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (IND vs SA) पाच सामन्यांची टी20 मालिका 19 जून रोजी संपल्यानंतर 26 जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. दरम्यान या मालिकेसाठी नुकतीच संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी यंदाच्या आयपीएल विजेत्या गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार करण्यात आलं आहे. तर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) उपकर्णधार असणार आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीलाही अखेर भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन याचंही संघात पुनरागमन झालं आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत संघाची घोषणा केली आहे.
आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 26 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
दुसरा टी20 सामना | 28 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)