(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
T20 Rankings Team India: हार्दिक पांड्याने टी20 विश्व कप 2024 च्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यासोबतच त्यानं मोठा रेकॉर्डही नावावर केलाय. टी20 क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान होणारा हार्दिक पांड्या पहिला खेळाडू ठरलाय.
T20 Rankings Team India : अष्टपैलू हार्दिक पांड्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आयसीसीच्या टी20 क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान होणारा हार्दिक पांड्या पहिला खेळाडू ठरलाय. 2024 टी20 विश्वचषकात हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळी करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. फायनलमध्ये हार्दिक पांड्याने भेदक गोलंदाजी करत विजय खेचून आणला. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भारतीय खेळाडूंनी दबदबा निर्माण केला होता. आता अष्टपैलूंच्या यादीत हार्दिक पांड्याने नवा किर्तिमान रचला आहे. टी20 क्रमवारीत विराट कोहली, सूर्यकुमार आणि जसप्रती बुमरहा यांनी याआधी अव्वल स्थानावर कब्जा मिळवलाय. आता अष्टपैलूंच्या यादीत हार्दिक पांड्याने झेंडा रोवलाय.
हार्दिक पांड्याने टी20 विश्व कप 2024 च्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यासोबतच त्यानं मोठा रेकॉर्डही नावावर केलाय. टी20 क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान होणारा हार्दिक पांड्या पहिला खेळाडू ठरलाय. हार्दिक पांड्या श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा याच्यासोबत संयुक्तपणे टी20 अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. पांड्या आणि हसरंगा यांना 222 रेटिंग गुण मिळाले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस आहे. झम्बाब्वेचा सिकंदर रजा चौथ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा शाकीब अल हसन पाचव्या क्रमांकावर आहे.
Hardik Pandya rises to No.1 in the latest ICC Men's T20I All-rounder Rankings: ICC
— ANI (@ANI) July 3, 2024
(Pic: ICC) pic.twitter.com/QZ4Gq76MRW
टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे तर पंड्यापूर्वी एकूण पाच खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. गौतम गंभीर, कोहली आणि सूर्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत. तर जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत. तर हार्दिक पांड्या हा अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान गाठणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 20 धावांत 3 विकेट घेतल्या आहेत. पांड्याने इंग्लंडविरुद्ध 23 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नाबाद 27 धावा केल्या. पांड्याने बांगलादेशविरुद्ध अष्टपैलू कामगिरी दाखवली. त्याने नाबाद 50 धावा केल्या होत्या. यासोबतच एक विकेटही घेतली होती.
Magnificent with the bat, valuable with the ball 🫡#TeamIndia Vice-captain @hardikpandya7 is now the ICC Men's Number 1⃣ T20I all-rounder 😎🔝 pic.twitter.com/cWH0TNF8wR
— BCCI (@BCCI) July 3, 2024