एक्स्प्लोर

Happy birthday Jasprit Bumrah | आईने वैतागून दिलेल्या सल्ल्याने बुमराहला गवसला 'यॉर्कर किंग' बनण्याचा मार्ग

Happy birthday Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह... भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज, ज्याचा समावेश आज जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये करण्यात येतो. पण बुमराहचा हा प्रवास सोपा नव्हता. जाणून घेऊया त्याची कहाणी...

Happy birthday Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह... जसप्रीत बुमराहला 2013 मध्ये कदाचितच कोणी ओळखत असेल. परंतु, आज संपूर्ण जगाभरातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये बुमराहने आपलं स्थान निर्माण केलं आहे. जगातील अनेक जगप्रसिद्ध फलंदाजांनाही बुमराहच्या गोलंदाजीची धास्ती असते. डेथ ओव्हरमध्ये बुमराहच्या गोलंदाजीची बातच और असते. अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये डेथ ओव्हरची धुरा बुमराहच्याच खांद्यावर सोपवण्यात आली होती. तसेच बुमराहने सुद्धा त्याच्यावर दाखवलेला हा विश्वास वेळोवेळी खरा ठरवला आहे. आज भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहचा वाढदिवस. आज जगप्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा हा खेळाडू यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधी मात्र अनेक कठिण समस्यांचा सामना करावा लागला होता.

जसप्रीत बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबादमध्ये झाला. त्याचे वडील जसबीर सिंह यांचा स्वतःचा व्यवसाय होता. तर आई दलजीत प्राथमिक शाळेक शिक्षिका होत्या. जेव्हा जसप्रीत अवघ्या 7 वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावरील त्याच्या वडिलांचं छत्र हरपलं. आईने जसप्रीत आणि त्याच्या बहिणीचा सांभाळ केला. ज्या शाळेत बुमराहची आई शिक्षिका होती, त्याच शाळेत त्याने आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.

क्रिकेटची बुमराहला प्रचंड आवड होती. त्याच्या या क्रिकेटप्रेमाची सुरुवात त्याने घरातूनच केली. जसप्रीत दिवसभर भिंतीच्या दिशेने चेंडू टाकून गोलंदाजी करत असे. एक दिवस आईने वैतागून त्याला सांगितलं, जर खेळायचं असेल तर असा बॉल टाक जेणेकरुन जास्त आवाज होणार नाही. त्यानंतर जसप्रीतने गोलंदाजी करण्यासाठी वेगळी स्टाइल शोधली आणि भिंतीऐवजी त्याने फ्लोर स्कर्टिंग (फरशीला जोडणारा खालचा भाग) वर बॉलिंग करण्यास सुरुवात केली. यातूनच जसप्रीतने यॉर्कर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.

जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये आपलं पदार्पणचा सामना 4 एप्रिल 2013 रोजी मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या सामन्यात बुमराहने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. या सामन्यात बुमराहने 32 धावा देत 3 फलंदाजांना बाद केलं. आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात 3 विकेट्स घेणारा तो पहिला खेळाडू होता. बुमराहने आतापर्यंत आयपीएलमध्ये 77 सामने खेळले आहेत. यापैकी त्याने 26.59 सरासरीने 82 विकेट्स घेतले. त्याचं आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन म्हणजे 3/7 आहे, जे त्याने 2017 मध्ये केलं होतं. 58 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.49च्या इकोनॉमीसोबत 103 विकेट घेतले आहेत. यादरम्यान, त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन 27/5 असं आहे. जर टी20 बाबात बोलायचं झालं तर जसप्रीतने 42 सामन्यांमध्ये 51 विकेट्स आपल्या नावे नावे केले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Birthday Special | जसप्रीत बुमराहसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियातील 'या' शिलेदारांचा आज वाढदिवस

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget