Rohit Sharma Hardik Pandya : रोहित शर्माने पुन्हा केला हार्दिक पांड्याचा गेम! गौतम गंभीरने सुद्धा हात टेकले... मिटिंगमध्ये नक्की काय घडलं?
Team India Squad for Champions Trophy 2025 : पाकिस्तानच्या यजमानपदाखाली 19 फेब्रुवारीपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
India Vice-Captain For Champions Trophy 2025 : पाकिस्तानच्या यजमानपदाखाली 19 फेब्रुवारीपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची (Team India Squad for Champions Trophy 2025) घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी 18 जानेवारी रोजी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता यांनी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. यासाठी पत्रकार परिषद दुपारी 12.30 वाजता होणार होती, परंतु ती अडीच तासांनी उशिराने झाली. आता हे समोर आले आहे की या विलंबाचे मुख्य कारण उपकर्णधाराचे नाव होते. ज्यावरून निवडकर्ते भारतीय कर्णधार आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. या दरम्यान, रोहित शर्माने पुन्हा पांड्यासोबत गेम खेळला.
India's squad for the #ChampionsTrophy 2025 announced! 💪 💪
— BCCI (@BCCI) January 18, 2025
Drop in a message in the comments below 🔽 to cheer for #TeamIndia pic.twitter.com/eFyXkKSmcO
रोहितला पांड्याला उपकर्णधार बनवायचे नव्हते....
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची जवळजवळ सर्व नावे आधीच निश्चित झाली होती. पण उपकर्णधारपदाच्या बाबतीत सुई अडकली होती. यासाठी निवड समितीची बैठक घेण्यात आली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनीही यात भाग घेतला.
गंभीरला पांड्याला उपकर्णधार बनवायचे होते, पण रोहितला ते मान्य नव्हते. तो आणि आगरकर ही जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवू इच्छित होते. यावर बराच वेळ चर्चा झाली. शेवटी, गंभीरला हार मानावी लागली आणि गिलचे नाव फायनल झाले.
पांड्यासोबत हे पहिल्यांदाच घडले नाही. एकदिवसीय सामन्यापूर्वी टी-20 चे कर्णधारपद सोपवताना बरीच चर्चा झाली. हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपदरम्यान आणि त्यापूर्वी संघाचा उपकर्णधार होता. त्यामुळे रोहितच्या टी-20 मधून निवृत्तीनंतर तो कर्णधार होईल हे निश्चित मानले जात होते. त्यावेळीही रोहित पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यावर ठाम होता.
रोहित आणि आगरकरचा प्रभाव इतका होता की, शेवटी सूर्याला कर्णधारपद मिळाले. पांड्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आणि गिलला उपकर्णधार बनवण्यात आले. ऑक्टोबर 2023 नंतर पांड्या पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळत आहे. याआधी तो संघाचा उपकर्णधार होता. पण आता हे पद त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे.
हे ही वाचा -