BCCI गौतम गंभीरचे पंख छाटणार? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये होणार मोठी उलथापालथ
पुढील महिन्यात हायब्रिड मॉडेलमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होतील.
Team India Batting Coach : पुढील महिन्यात हायब्रिड मॉडेलमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होतील. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. आगामी स्पर्धेसाठी दोन्ही देशांनी अद्याप त्यांचे संघ जाहीर केलेले नाहीत तर सहा संघांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. असे मानले जाते की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा 19 जानेवारीपर्यंत होईल. टीम इंडिया या स्पर्धेत आपला पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळणार आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी बीसीसीआय एक मोठा निर्णय घेऊ शकते. ज्यामुळे टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल दिसून येऊ शकतो.
BCCI गौतम गंभीरचे पंख छाटणार?
भारतीय क्रिकेट संघाने अलिकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती, परंतु फलंदाजी हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय राहिला. त्यामुळे भारतीय संघालाही पराभवाचा सामना करावा लागला. या कारणास्तव, बीसीसीआय कोचिंग स्टाफमध्ये नवीन सदस्य, विशेषतः फलंदाजी प्रशिक्षकाची भर घालण्याची शक्यता आहे. या संदर्भात बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनातील चर्चेतून असे दिसून आले आहे की कोचिंग स्टाफला बळकटी द्यायची आहे. ही बातमी समोर आल्यानंतर, बोर्डाचा गौतम गंभीरवरील विश्वास उडाला आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय या पदासाठी काही मोठ्या नावांचा विचार करत आहे. ज्यामध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. पण, कोणत्याही नावाबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या, टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये गौतम गंभीर (मुख्य प्रशिक्षक), मॉर्ने मॉर्केल (बॉलिंग प्रशिक्षक), अभिषेक नायर (सहाय्यक प्रशिक्षक), रायन टेन डोइशे (सहाय्यक प्रशिक्षक) आणि टी दिलीप (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया फलंदाजी प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाहता टीम इंडियाच्या फलंदाजीत लवकरात लवकर सुधारणा करण्याची गरज असल्याचे दिसून येते. पण, बहुतेक चाहत्यांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या खराब फलंदाजीवर आहे. या दोन्ही फलंदाजांनी त्यांच्या नावांनुसार कामगिरी केलेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन्ही फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. कोचिंग स्टाफने बीसीसीआयकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
हे ही वाचा -