Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला डच्चू? सिडनी कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल, गौतम गंभीरने प्लेइंग-11 बाबत दिली मोठी अपडेट
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना उद्या म्हणजेच 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.
Ind vs Aus 5th Test Playing XI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना उद्या म्हणजेच 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. सिडनी कसोटीच्या एक दिवस आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत घेतली. पत्रकार परिषदेत जेव्हा कर्णधार रोहित शर्मा सिडनीमध्ये पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणार का, असा प्रश्न गौतम गंभीरला विचारण्यात आला तेव्हा त्याने मोठे वक्तव्य केले.
रोहित पत्रकार परिषदेला का आला नाही? गंभीर म्हणाला...
सिडनी कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या जागी कोच गौतम गंभीरने पत्रकार परिषदेला हजेरी लावली. पण कर्णधार सहसा सामन्याच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेला येतात. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीबद्दल प्रशिक्षक गौतम गंभीरला विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, सर्व काही ठीक आहे आणि पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षकाची उपस्थिती पुरेशी असावी.
रोहित शर्मा होणार सिडनी कसोटीतून बाहेर?
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे होणारा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणार का, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. गौतम गंभीर म्हणाला की, 'सर्व काही ठीक आहे आणि पत्रकार परिषदेत त्याची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय आहे असे मला वाटत नाही. मुख्य प्रशिक्षक येथे आहे. आणि आम्ही उद्या खेळपट्टी पाहून आमची प्लेइंग इलेव्हन निवडू.
रोहितवर झाली जोरदार टीका
चौथ्या कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्मावर खूप टीका झाली, कारण त्याने गिलला प्लेइंग-11 मधून बाहेर ठेवले होते. रोहितच्या सलग अपयशानंतर काही माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी त्याच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. सिडनी कसोटीनंतर रोहित रेड बॉलच्या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर करेल, असेही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उच्चपदस्थ अधिकारी आणि निवडकर्त्यांनी या निर्णयाबाबत आधीच चर्चा केल्याचीही चर्चा आहे.
आकाशदीप पाचव्या कसोटीतून बाहेर
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत प्लेइंग इलेव्हनबाबत मोठा अपडेट दिला आहे. त्याने सांगितले की, वेगवान गोलंदाज आकाशदीप पाचव्या कसोटीत खेळणार नाही. त्याला पाठीचा त्रास आहे. गंभीर म्हणाला की, आम्ही विकेट बघू आणि मग प्लेइंग इलेव्हन ठरवू. रोहित शर्माच्या ऋषभ पंतच्या वक्तव्याबाबत विचारले असता गंभीर म्हणाला, मला कोणाबद्दलही काही बोलायचे नाही.
हे ही वाचा -