Gautam Gambhir : देशसेवा करण्यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट असू शकत नाही, भारताचा मुख्य प्रशिक्षक बनताच गौतम गंभीरची प्रतिक्रिया
Gautam Gambhir : गौतम गंभीर याची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे. गौतम गंभीरनं यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (Team India New Head Coach) गौतम गंभीर यानं (Gautam Gambhir) जय शाह यांनी केलेल्या घोषणेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. जय शाह यांनी गौतम गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारेल, असं ट्विट केलं होतं. भारतचं माझी ओळख असून देश सेवा करण्यापेक्षा दुसरी मोठी सन्मानाची गोष्ट असू शकत नाही, असं गंभीर म्हणाला. गौतम गंभीरनं म्हटलं की ज्या ज्या वेळी भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा भारताच्या चाहत्यांना अभिमान वाटेल, असं म्हटलं.
गौतम गंभीर काय म्हणाला?
गौतम गंभीरनं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाल्यानंतर प्रसिद्धीपत्रक जारी केलं. भारत माझी ओळख आहे, माझ्या देशाची सेवा करण्यापेक्षा दुसरी महत्त्वाची गोष्ट नाही. भारतीय संघात परतल्यानंतर अभिमान वाटत असून सन्मानित वाटत असल्याचं म्हटलं. मात्र यावेळी डोक्यावर टोपी वेगळी असेल. माझं प्रत्येक भारतीयाला अभिमानाची भावना वाटेल असं काम असेल. भारतीय संघ 140 कोटी नागरिकांच्या भावनांचा आणि स्वप्नांचा भार खांद्यावर घेऊन पुढं जातो. भारतीय संघासोबत काम करत ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं गौतम गंभीर म्हणाला.
Many thanks for your extremely kind words and constant support @JayShah bhai. Elated to be a part of this journey! The entire team together will strive for excellence and newer heights. https://t.co/BgAbTwN59u
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 9, 2024
टीम इंडियाच्या हेड कोचच्या शर्यतीत गौतम गंभीर सोबत भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी कोच डब्ल्यू वी रमन होते. यामध्ये गौतम गंभीरनं बाजी मारली. भारतीय संघ जुलै अन् ऑगस्टमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत पहिल्या मालिकेत सहभागी होईल.
गौतम गंभीरनं भारताकडून 58 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 9 शतकं आणि 22 अर्धशतकं केली आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 4154 धावा आहेत. गंभीरनं भारतासाठी 147 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये गंभीरनं 11 शतकं आणि 34 अर्धशतकं केली आहेत. गंभीरच्या नावावर 5238 धावा आहेत. गंभीरनं 37 टी 20 सामने खेळले असून त्यात त्यानं 7 अर्धशतकं केली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.
गौतम गंभीरनं आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सला 2012 आणि 2014 असं दोनवेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामात गंभीरनं केकेआरचं मेंटॉर म्हणून काम केलं. केकेरआनं 2024 ला विजेतेपद मिळवलं. आता भारताला आयसीसीच्या चार स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून देणं गंभीर पुढील आव्हान असेल.
संबंधित बातम्या :
Gautam Gambhir : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ते वन डे वर्ल्ड कप, गौतम गंभीरसमोर टार्गेट काय काय?