एक्स्प्लोर

Sikandar Raza: आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये इतिहास-भूगोल बदलला; विक्रम मोडत झळकावले सर्वात जलद शतक, कोण आहे सिकंदर रझा?

Gambia vs Zimbabwe: सिकंदर रझाने 2013 मध्ये झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Sikandar Raza Fastest T20 Hundred: 23 ऑक्टोबर 2024 ही तारीख झिम्बाब्वे आणि गाम्बिया (Gambia vs Zimbabwe) या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. याच दिवशी झिम्बाब्वेने टी-20 क्रिकेटमध्ये 344 धावा करत इतिहास रचला आहे, तर गाम्बियाने 290 धावांनी पराभवाचा लाजिरवाणा विक्रम जोडला आहे. झिम्बाब्वे आणि गाम्बिया यांच्यात झालेल्यी टी-20 सामन्यात सिकंदर रझाने अनेक विक्रम करत इतिहास बदलून टाकला. 

झिम्बाब्वेचा सिंकदर रझा (Sikandar Raza) टी-20 क्रिकेटमध्ये अवघ्या 33 चेंडूत शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला. झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझाने 43 चेंडूत 15 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 133 धावा केल्या. सिकंदर रझा टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलरचा रेकॉर्ड तोडला. रोहित आणि मिलर या दोघांनी 2017 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये 35-35 चेंडूत शतके झळकावून मोठी कामगिरी केली होती.  

टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारे फलंदाज-

सिकंदर रझा - 33 चेंडू वि. गाम्बिया, 2024
रोहित शर्मा - श्रीलंका विरुद्ध 35 चेंडू, 2017
डेव्हिड मिलर - बांगलादेश विरुद्ध 35 चेंडू, 2017
जॉन्सन चार्ल्स - 39 चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2023
संजू सॅमसन - 40 चेंडू विरुद्ध बांगलादेश, 2024

कोण आहे सिंकदर रझा?

सिकंदर रझाने 2013 मध्ये झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण त्यांच्या आयुष्याची सुरुवात पाकिस्तानमधील सियालकोटमधून झाली. सिकंदरचा जन्म 24 एप्रिल 1986 रोजी सियालकोटमध्ये झाला. सिंकदर रझाला मोठा झाल्यावर त्याला पाकिस्तानी हवाई दलात भरती व्हायचे होते. पाकिस्तान एअरफोर्स पब्लिक स्कूलमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. दुर्दैवाने तो एका चाचणीत नापास झाला, त्यामुळे त्याचे हवाई दलात जाण्याचे स्वप्न भंगले. सिंकदर रझाचे कुटुंब 2002 मध्ये झिम्बाब्वेला स्थायिक झाले.

पाकिस्तानची उडवली होती खिल्ली-

सिकंदर रझा हा मूळचा पाकिस्तानी असला तरी काही वर्षांपूर्वी झिम्बाब्वेने 2022 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला एका धावेने पराभूत करून आश्चर्यचकित केले होते. या पराभवामुळे पाकिस्तान संघावर जोरदार टीका झाली होती. सामन्यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाला जेव्हा विचारण्यात आले की, सामन्यात त्याला कधी वाटले की आपण पाकिस्तानला हरवू शकतो. प्रत्युत्तरात सिकंदर म्हणाला की, पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच आम्ही पाकिस्तानला पराभूत करू शकू, असा विश्वास होता. सिंकदर रझाच्या या विधानानंतर सोशल मीडियावर तो चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देखील मिळाली. 

संबंधित बातमी:

Zimbabwe T20 World Record : 27 षटकार 30 चौकार अन् 344 धावा... टी-20 क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेने मोडले सर्व रेकॉर्ड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Crisis: आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Elections 2024 : समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
Manoj Jarange: मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas kadam On Kokan Vidhansabha : कोकणात शिवसेनेला सार्वाधिक जागा कदमांचा खोचक टोलाDhananjay Munde Parli Vidhan Sabha : उमेदवारी अर्ज भरण्यााधी धनंजय मुंडे यांचं औक्षणSameer Bhujbal Nandgaon Vidhansabha : समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढणार, 28 ऑक्टोबरला अर्ज भरणारEknath Shinde Delhi Daura : एकनाथ शिंदे आज दिल्लीत,   महायुतीचा जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Crisis: आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Elections 2024 : समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
Manoj Jarange: मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
Dhananjay Munde: कोणताही थाट नाही,  बडेजाव नाही,  शक्तीप्रदर्शनही टाळलं; धनंजय मुंडे परळीतून साधेपणाने उमेदवारी अर्ज भरणार
कोणताही थाट नाही, बडेजाव नाही, शक्तीप्रदर्शनही टाळलं; धनंजय मुंडे परळीतून साधेपणाने उमेदवारी अर्ज भरणार
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : समीर भुजबळ बंडखोरीवर ठामच, नांदगावमधून अपक्ष रिंगणात उतरणार, कांदेंचं टेन्शन वाढलं?
मोठी बातमी : समीर भुजबळ बंडखोरीवर ठामच, नांदगावमधून अपक्ष रिंगणात उतरणार, कांदेंचं टेन्शन वाढलं?
MVA Seat Sharing: मविआच्या जागावाटपाचं गणित चुकलं, सगळा गोंधळच गोंधळ; काँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार?
मविआच्या जागावाटपाचं गणित चुकलं, सगळा गोंधळच गोंधळ; काँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार?
Pune Water Tank collapsed: पाण्याची भलीमोठी टाकी कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, दोघांच्या मृत्यूची शक्यता, भोसरीच्या सद्गुरू नगरमधील घटना
पाण्याची भलीमोठी टाकी कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, दोघांच्या मृत्यूची शक्यता, भोसरीच्या सद्गुरू नगरमधील घटना
Embed widget