एक्स्प्लोर

IND vs SL T-20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात सुरक्षेसाठी प्रथमच होणार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना 26 फेब्रुवारीला धर्मशाला याठिकाणी होणार आहे. यामध्ये प्रथमच सामन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

IND vs SL T-20 : काही दिवसांपूर्वी भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (Sri Lanka Team) 62 धावांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता दुसरा टी -20 सामना 26 फेब्रुवारीला धर्मशाला याठिकाणी होणार आहे. यामध्ये प्रथमच सामन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 

धर्मशाला येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 26 फेब्रुवारीला टी-20 सामना होणार आहे. या सामन्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. सामन्यादरम्यान 4 ते 5 ड्रोनची मदत घेतली जाणार असल्याची माहिती कागरा खुशाल शर्मा यांनी दिली. स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात ड्रोनद्वारे संपूर्ण पाळत ठेवली जाणार आहे.

पार्किंगच्या ठिकाणांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून वाहन चोरीला जाण्याची शक्यता राहणार नाही. याच सामन्यात कांगडा जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील सुमारे 850 पोलीस कर्मचारी देखील कर्तव्यासाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. एसपी कांगडा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. खुशाल शर्मा म्हणाले की, खेळाडू, व्हीव्हीआयपी आणि प्रेक्षक यांच्या सुरक्षेसोबत पोलीस वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे काम करतील. या सामन्यासाठी शहराची विभागणी 19 सेक्टरमध्ये करण्यात आली असून, प्रत्येक सेक्टरमध्ये राजपत्रीत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उप-सेक्टर आणि पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. धर्मशाला या ठिकाणी दोन टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होआल. तिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Shubman Gill: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget