एक्स्प्लोर

Indian Hockey Team: कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतीय हॉकी संघात कोरोनाचा विस्फोट!

भारतीय हॉकी पुरुष संघाच्या प्रशिक्षकासह पाच सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे.

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्सची तयारी करणाऱ्या भारतीय हॉकी पुरुष संघात (Indian men’s hockey team) कोरोनाचा विस्फोट झालाय. भारतीय हॉकी पुरुष संघाच्या प्रशिक्षकासह पाच सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना संक्रमित हॉकी संघाच्या सदस्यांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.हॉकी इंडियानं कोणाचेही नाव न घेता प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची तयारी करणाऱ्या भारतीय हॉकी संघातील दोन खेळाडूंसह तीन सदस्यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत." 

सुत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, "संघाचा स्टाईकर गुरजंत सिंह आणि ग्राहम रीड यांचाही कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. तर, संघाचा व्हिडिओ विश्लेषक अशोक कुमार चिन्नास्वामी यांनाही कोरोनाची लागण झालीय."  भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या शिबिरात श्रीजेश, मनप्रीत सिंग, पवन, ललित कुमार उपाध्याय, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार आणि अमित रोहिदास यांच्यासह 31 खेळाडू भाग घेत आहेत. एफआयएच हॉकी प्रो लीगमध्ये बेल्जियम आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळल्यानंतर खेळाडू शिबिरात पोहोचले.

ट्वीट-

स्पर्धेसाठी 18 सदस्यीय संघाचा कर्णधार मनप्रीत असणार असून त्याच्याच नेतृत्त्वाखाली भारताने यंदा ऑलिम्पिक पदक मिळवलं. टोक्यो ओलिम्पिक 2020 (Tokyo 2022) स्पर्धेत जवळपास 40 वर्षानंतर पदकावर नाव कोरलं. कांस्य पदक मिळवलेला भारत आता या कॉमनवेल्थमध्येही अप्रतिम कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. यावेळी उपकर्णधार असणारा हरमनप्रीत सिंह एफआयएच प्रो लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू असल्याने त्याच्याकडूनही संघाला अधिक अपेक्षा असणार आहेत. कॉमनवेल्थ गेम्सबद्दल बोलताना संघाचे मुख्य कोच ग्राहम रीड म्हणाले, "आम्ही कॉमनवेल्थ गेम्ससाठी एक दमदार संघ घेऊन चाललो आहोत. या सर्व खेळाडूंकडे महत्त्वाच्या सामन्यात चागंल्या खेळाचा अनुभव आहे."

कॉमनवेल्थसाठी भारतीय हॉकी संघ:

गोलकीपर: पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादुर पाठक.

डिफेंडर: वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जुगराज सिंह आणि जरमनप्रीत सिंह.

मिडफील्डर: मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, आकाशदीप सिंह आणि नीलकांत शर्मा.

फॉरवर्ड: मनदीप सिंह, गुरजंत सिंह, ललित कुमार उपाध्याय आणि अभिषेक.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
Embed widget