एक्स्प्लोर

Team India: अक्षर पटेल जबरदस्त फॉर्मात, रवींद्र जाडेजाची संघातील जागा धोक्यात? 

Axar Patel : अष्टपैलू अक्षर पटेलने अलीकडच्या काळात टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे रवींद्र जाडेजाचं संघातील स्थान धोक्यात आल्याच्या चर्चा आहेत.

Axar Patel and Ravindra Jadeja : न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) क्रिकेट मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) नुकतीच घोषणा झाली. सोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संघाची घोषणा झाली आहे. दरम्यान यावेळी न्यूझीलंडविरुद्ध अक्षर पटेल (Axar Patel) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दोघेही संघात नाहीत, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोघांनाही संघात संधी मिळाली आहे. अशामध्ये दोघांची संघातील जबाबदारी सारखीच असल्यानं नेमकी अंतिम 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माणझाला आहे. अक्षरच्या तुलनेत जाडेजा अनुभवी असला तरी अलीकडच्या काळात अक्षरच्या कामगिरीनं त्याला संघाबाहेर करणं निवडसमितीसाठी अवघड झालं आहे.

रवींद्र जाडेजाने 31 ऑगस्ट रोजी आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. गेल्या चार महिन्यांपासून तो संघापासून दूर आहे. अशा स्थितीत जाडेजाला संघात स्थान मिळालं असलं तरी त्याच्या दुखापतीवर त्याला खेळवणं अवंलंबून असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. तरसंच तो  संघात येताच चांगली कामगिरी करेल हे निश्चित नाही. त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलने टीम इंडियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 52 धावा करण्यासोबतच त्याने 8 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय एकदिवसीय मालिकेत एका अर्धशतकासह 76 धावा करण्यासोबतच त्याने 2 बळीही घेतले. श्रीलंकेविरुद्धही अक्षरची चमकदार कामगिरी कायम आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याने 31, 65 आणि 21 धावा देत तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी, अक्षरने श्रीलंकेविद्धच्या एकदिवसीय मालिकेतील 2 सामन्यांमध्ये 30 धावा करण्यासोबतच एक विकेटही घेतली आहे. त्यामुळे अक्षर आणि जाडेजा यांच्यात अंतिम 11 मध्ये आणि भविष्यातील सामन्यांत कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सIndia Alliance Pc : भाजपचं केवळ तोडा-फोडा आणि राज्य करा, उद्धव ठाकरेंची टीका ABP MajhaUddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Uddhav Thackeray : राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल...मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, खरगे अन् शरद पवार म्हणाले...
राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल, उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींच्या टीकेवर उत्तर
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget