Eng vs Ind 4th Test : लॉर्ड्स कसोटी संपताच 24 तासांच्या आत इंग्लंडचा मोठा निर्णय, भारतविरुद्ध आखला चक्रव्यूह, 8 वर्षांनंतर 35 वर्षीय फिरकीपटूची एंट्री, कोण आहे तो?
India vs England 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सोमवारी संपला आणि पुढील कसोटीसाठी संघाची घोषणा दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी करण्यात आली.

Liam Dawson Replaces Shoaib Bashir 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सोमवारी संपला आणि पुढील कसोटीसाठी संघाची घोषणा दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी करण्यात आली. भारताने संपूर्ण मालिकेसाठी संघ जाहीर केला होता, परंतु इंग्लंड प्रत्येक कसोटीपूर्वी संघ जाहीर करत आहे. दरम्यान, चौथ्या कसोटीपूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या संघात बदल करण्यात आला आहे. हे आधीच अपेक्षित होते.
शोएब बशीर कसोटी मालिकेतून बाहेर
लॉर्ड्स कसोटीत मोहम्मद सिराजची शेवटची विकेट घेऊन संघाला विजय मिळवून देणारा शोएब बशीर आता मालिकेतून बाहेर गेला आहे. प्रत्यक्षात, तो लॉर्ड्स कसोटीतच जखमी झाला. तो चौथ्या डावात गोलंदाजी करण्यासाठीही येणार नव्हता, परंतु जेव्हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला वाटले की सामना हाताबाहेर जाऊ शकतो, तेव्हा जखमी शोएब बशीरला बोलावण्यात आले आणि त्यानेही त्याचे काम केले. मोहम्मद सिराजला आऊट करून त्याने भारताची शेवटची विकेट घेतली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
Welcome, Daws! 👋
— England Cricket (@englandcricket) July 15, 2025
Spinner Liam Dawson joins our squad for the Fourth Test match against India 🏏
Full story 👇
लियाम डॉसन जवळजवळ आठ वर्षांनी संघात परतला...
दरम्यान, ईसीबीने शोएब बशीरच्या जागी लियाम डॉसनला संघात समाविष्ट केल्याची घोषणा केली आहे. भारतीय चाहत्यांनी लियाम डॉसनचे नाव फारसे ऐकले नसेल. परंतु त्याने आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांमध्ये 7 विकेट घेतले आहेत. आतापर्यंत त्याने इंग्लंडसाठी 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 विकेट घेतले आहेत. इतकेच नाही तर त्याने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 11 विकेट घेतले आहेत.
लियाम डॉसनने भारताविरुद्ध कसोटी केले होते पदार्पण...
रंजक गोष्ट अशी आहे की, लियाम डॉसनने 2016 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर हा सामना चेन्नईमध्ये खेळला जात होता. 2016 मध्ये पदार्पण केल्यानंतर लियाम डॉसनने जुलै 2017 मध्ये शेवटचा सामना खेळला. त्यानंतर तो पुन्हा एकदा पुनरागमन केला आहे. म्हणजेच सुमारे आठ वर्षांनी लियाम डॉसन कसोटीत परतत आहे. विशेष म्हणजे तो त्याच भारतीय संघाविरुद्ध खेळेल ज्याविरुद्ध त्याने पदार्पण केले होते. पण, चौथ्या कसोटीसाठी अजूनही वेळ आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टर येथे खेळला जाईल.
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर : बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, ऑली पोप, जेमी ओव्हरटन, जोश टंग, ख्रिस वोक्स.





















