ICC POTM : इंग्लंडचा हॅरी ब्रूक यंदाचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ! पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यांतील कामगिरीची पोचपावती
ICC Player of the month : आयसीसी कडून दर महिन्याला प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार देण्यात येतो, महिनाभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं.
Harry Brook : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकची (Harry Brook) डिसेंबर महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून आयसीसीने निवड केली आहे. हॅरी ब्रूक डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट लयीत दिसला. त्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने एकूण 3 शतकं झळकावली. याच मालिकेमुळे ब्रूकला हा पुरस्कार मिळाला आहे. हॅरी ब्रूकसह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांना यासाठी नामांकन देण्यात आलं होते. ब्रूकने दोन्ही फलंदाजांना मात देत हे विजेतेपद पटकावले.
View this post on Instagram
पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत हॅरीने 93.41 च्या सरासरीने एकूण 468 धावा केल्या. ब्रूक त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मधल्या फळीतील फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या जागी ब्रूकचा संघात समावेश करण्यात आला. ब्रुकने या संधीचा चांगला फायदा उचलला. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 116 चेंडूत 153 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीत 19 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 131.90 होता. त्याला कसोटी मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देखील देण्यात आला.
IPL 2023 च्या लिलावातही मिळाली मोठी रक्कम
आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादने हॅरीला 13.25 कोटींची बोली लावून विकत घेतले. ब्रूक 2023 मध्ये पहिला आयपीएल सीझन खेळेल आणि पहिल्याच आयपीएलमध्ये त्याला एवढ्या मोठ्या बोलीने खरेदी करण्यात आले.
आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
ब्रूकने आतापर्यंत इंग्लंडकडून कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 4 कसोटी सामन्यांच्या 6 डावात 80 च्या सरासरीने 480 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर तीन शतके आणि एक अर्धशतक आहे. याशिवाय त्याने 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 26.57 च्या सरासरीने आणि 137.77 च्या स्ट्राइक रेटने 372 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
Virat Kohli Century : शतक नंबर 73! नववर्षाच्या सुरुवातीला शतक ठोकत कोहलीनं नवा रेकॉर्डही केला नावावर